लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून एनडीए ३३3 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर युपीएचेही 98 उमेदवार आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजप २४ , शिवसेना २० , काँग्रेस ० आणि राष्ट्रवादी ४ जागांवर आघाडीवर आहे.
सकाळी ११.३० पर्यंत हाती आलेल्या कालांनुसार देशासह महाराष्ट्रात देखील धक्कादायक निकाल हाती येताना दिसत आहेत. महाराष्ट्रात युतीच्या ३५-४० जागा तर आघाडीच्या १२-१८ जागा येतील असा अंदाज बऱ्यापैकी सर्वच एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलं होतं. पण सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मात्र धक्कादायक निकाल येताना दिसत आहे.
औरंगाबादची लढत चर्चेची विषय ठरली होती. इथे अनपेक्षित निकाल हाती येताना दिसत आहेत. जाणून घेऊया सकाळी औरंगाबादमध्ये सकाळी ११.३० वाजेपर्यंत कोणाला किती मते मिळाली.
इम्तियाज जलील हे औरंगाबादमध्ये आघाडीवर आहेत. त्यांना ८२७६६ मते मिळाली आहेत. इथे दुसऱ्या क्रमांकावर हर्षवर्धन जाधव आहेत. त्यांना ७१९०२ मते मिळाली आहेत.
औरंगाबादचे कल शिवसेनेसाठी धक्कादायक ठरताना दिसत आहेत. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. त्यांना सकाळी ११.३० पर्यंत ६२३४५ मते मिळाली आहेत.
तर काँग्रेसच्या सुभाष झांबड यांना १६१०० मते मिळाली आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.