आपण अनेक वेळा बघितलं असेल की आपल्या आजूबाजूला एखादी चांगली शिकलेली हुशार आणि देखणी मुलगी तिच्यायोग्य अशा सुशिक्षित समजूतदार मुलाला सोडून एखाद्या टुकार मुलाच्या प्रेमात पडली आहे ! हे असं काही बघितलं की आपण बेचैन होतो. “देवा आम्ही काय पापं केली होती ?’ असा प्रश्न विचारत बसतो. पण हे असं का होतं ? टुकार मुलांनाच सुंदर मुली कशा पटतात ? चला तर जाणून घेऊया…
१) सगळी कमाल आहे आत्मविश्वासाची !
अशा मुलांमध्ये आत्मविश्वासाची अजिबात कमतरता नसते. त्यामुळेच मुली त्यांना लवकर इम्प्रेस होतात. ही मुले त्यांना आवडणाऱ्या गोष्टींमागेच धावतात आणि जे मनात असते तेच बोल्ट असतात, करत असतात ! ते फक्त आपल्या मनाचे ऐकतात. त्यांना मुलींच्या नकाराची भीती नसते, कदाचित त्यामुळेच प्रपोज करायलाही त्यामुळेच घाबरत नाहीत. चांगल्या मुलांना नकाराची भीती असते, त्यामुळे अनेकदा ते मुलीला आपल्या मनातील फीलिंग्स सांगत नाहीत.
२) सुरक्षेची भावना
मुले जास्तकरून सुंदर मुलींच्या मागे लागतात. अशावेळी कुठल्याही मुलीला सुरक्षित वाटण्यासाठी संरक्षणाची गरज असते. ही सुरक्षा गुडबॉय त्यांना देऊ शकत नाही, कारण ते स्वतःच भित्रे असतात. अशी मुले काय मुलींचे संरक्षण करणार ?
३) त्यांना मुलीला खुश करायला जमते
टुकार मुलांच्या बाबतीतली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांना मुलींना खुश ठेवता येते. ते मुलींना बोअर होऊन देत नाहीत. चांगली मुले अभ्यास, करिअर अशा गोष्टींवर लक्ष देतात. टुकार मुलांकडे मुलींना सांगण्यासाठी इतके किस्से असतात की ते ऐकून मुली कधी बोअर होत नाहीत.
४) साध्या गोष्टीतून वेगळेपणा जपतात
मुलींना इम्प्रेस करण्यासाठी गुडबॉय एखाद्या कॅफे किंवा बागेत जाऊन गुडघ्यावर बसून सोन्याची अंगठी बोटात घालून प्रपोज करतील. पण आपली टुकार मंडळी असे काहीतरी वेगळ्या गोष्टी करतात ज्याची मुलींनी कल्पना केलेली नसते. ब्लेडने हातावर नाव काढ, बिल्डिंगवर चढ, गाड्यांची रेस लाव, भांडण कर नाहीतर मुलीला एखाद्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गाड्यावर पाणीपुरी, वडापाव खायला घाल अशा साध्या गोष्टीतून ते मुलीचे लक्ष वेधून घेतात. बहुतेक वेळा त्यांच्या या करामती मुलींना आवडतात आणि या टुकार मुलांना सुंदर मुली पटतात !
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.