आता सुट्ट्या आहे अनेक लोक गोवा जाण्याचा प्लान करत आहेत. परंतु गोवा जेवढे सुंदर आहे तेवढीच सुंदर आहे गोव्याची रात्र म्हणजे गोव्याची Nightlife आहे. तर वाचा कसा एन्जॉय करू शकता तुम्ही गोव्याचा प्लान
क्लब पार्टीस
तुम्ही अनेकदा क्लब पार्टी मध्ये गेला असाल परंतु गोव्या मध्ये होणाऱ्या क्लब पार्टीची मजाच वेगळी आहे. रात्री उशिरा पर्यंत चालणाऱ्या या पार्टीची मजा तुम्ही घेऊ शकता. गोव्यात अनेक प्रसिद्ध क्लब आहेत.
बीच पार्टी
मस्त थंड समुद्र किनारा आणी त्यावर रात्रभर चालणारी पार्टी सोबत सीफूड याचा विचार केला नसेल तर गोव्याला जाऊन फायदा नाही. अचानक बीचवर आकाशात फुटणारे फटाके या गोष्टीची शान अधिक वाढवितात. जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर तुम्ही प्रायवेट बीच पार्टी अरेंज करू शकता.
बीचच्या किनाऱ्यावर तुम्ही प्रेयसीसोबत कैंडल लाईट डिनर देखील करू शकता. आणि विशेष म्हणजे गोव्यातील रेस्टोरंट रात्रभर सुरु राहतात. रात्रभर येथे आपण गोव्यात बियर अथवा ड्रिंक एन्जॉय करू शकता. मुलीना देखील गोव्याची नाईटलाईफ सेफ आहे. रात्री बीचवर नाचायला देखील मजा येते.
गोव्यातील नाईट मार्केट
Saturday market (the Arpora Beach) Mackie’s Saturday Night Bazaar (Baga Beach) येथे रात्रभर चालणारे बाजार भरतात तिथे आपण रात्री देखील शॉपिंग करू शकता.
क्रुज पार्टी
रात्री गोव्यात चालणाऱ्या क्रुज देखील आहेत जिथे आपण पार्टी सोबत कसिनोचा अनुभव घेऊ शकता. मंडोवी नदीवर चालणाऱ्या या क्रुज एकदा तरी नक्की बघाच. बीच रेव पार्टी करिता देखील गोवा प्रसिद्ध आहे. ओक्टोंबर ते मार्च महिन्यात या पार्टी चालतात. एवढी माहिती आपल्याला गोव्यातील रात्र एन्जॉय करायला भरपूर आहे.
तुम्हाला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका.