मंगळवारी बीजेपी आणि तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यात हाणामारी झाली, या वेळेस पार्टी अध्यक्ष अमित शाह कलकत्ता येथे रोड शो करत होते. यावेळेस दोन पार्टीच्या कार्यकर्त्यात हि हाणामारी झाली.हिंसा एवढी वाढली कि विद्यासागर कॉलेज मधील ईश्वर चंद विद्यासागर यांचे स्मारक तोडण्यात आले. या घटने करिता पार्टी एक मेकांना दोष देत आहे.
कोण होते ईश्वर चंद विद्यासागर?
बंगाल मध्ये कोणीही विचार करू शकत नाही कि ईश्वर चंद विद्यासागर यांची मूर्ती तोडण्यात येईल. बंगाल मध्ये त्यांचा रुबाब काय होता याचा प्रत्यत २००४ मध्ये BBC ने केलेला Greatest Bengali Of All Time मध्ये त्यांना ९वे स्थान मिळाले होते.
ईश्वर चंद विद्यासागर यांचा जन्म २६ सप्टेंबर १८२० मध्ये ब्रिटीश काळात झाला होता. रूढीवादी ब्राम्हण कुटुंबात जन्म झाला तरी त्यांचे विचार क्रांतिकारी होते. त्यांनी बंगाल आणि हिंदू समाजात अनेक बदल केले.
ते एक महान लेखक, समाज सुधारक आणि भाषेचे गाढे अभ्यासक होते. समाजात महिलांना मानाचे स्थान देण्याकरिता त्यांनी अनेक प्रयत्न केले. बहु विवाह, बाल विवाह, विधवाचे लग्न, स्त्रियांचे शिक्षण इत्यादी करिता आजची त्यांची प्रशंसा केली जाते. त्यांच्या प्रयत्नामुळेच इंग्रज सरकारने १८५६ साली विधवा पुनर्विवाह विषयी कायदा संमत केला. मुली करिता त्यांनी अनेक शाळा उघडल्या.
विद्यासागर यांना आधुनिक बंगाली भाषेचे जनक देखील मानल्या जाते. त्यांनी बंगाली भाषेत typography नुसार बदल केले. त्यासोबत त्यांचा संस्कृत आणि बंगाली भाषेत अनेक शोध घेतले. त्यांनी या दोन भाषेवर अनेक पुस्तके लिहली आहेत.
हि गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे कि त्यांचे खरे नाव विद्यासागर नसून इश्वरचंद्र बंदोपाध्याय हे आहे. त्यांच्या संस्कृतमधील ज्ञान पाहून त्यांना लोक विद्यासागर म्हणत. पुढे चालून त्यांनी ज्या संस्कृत कॉलेज मधून शिक्षण पूर्ण केले त्या कॉलेज वाल्यांनी त्यांना हि पदवी दिली.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर व लाईक करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.