एखाद्या राजकीय अथवा सिनेस्टारला जेवढी प्रसिद्धी नाही त्या पेक्षा अधिक प्रसिद्धी तैमुर ला आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमुर त्याच्या जन्मापासून प्रसिद्धी त्याच्या मागे आहे. तैमुर काय जेवतो, काय घालतो, केव्हा झोपतो इत्यादी सर्व गोष्टीच्या बातम्या बनतात आणि त्यावर चर्चा देखील केली जाते.
आज मदर्स डे आणि तैमुरच्या आईचा विषय निघणार नाही हे शक्य आहे का. बॉलीवूड मध्ये अनेक आई आहेत पण करीना कपूर सारखी कुल आई कदाचितच बघायला मिळेल. करीना का कुल आहे कारण या अगोदर जर एखादी अभिनेत्री गर्भवती असल्यास ती कैमेरा पासून दूर राहायची परंतु करीनाने हि परंपरा मोडली.
आपल्या कामातून लंबा ब्रेक न घेता करीना कपूर काम करत आणि मिडीयाला हि वेळ देत होती. आपल्याला माहिती आहे का करीनाने तैमुर झाल्यावर डॉक्टरला काय विचारले तर तिने विचारले कि “माझ्या मुलाला आजारा पासून कसे दूर ठेऊ ? मला माहिती आहे कि तो आजारा पासून दूर राहिला तर चांगले राहणार”
तैमुर झाल्या नंतरहि करीना कामापासून दूर गेली नाही ती आत्ताही काम करते. चांगली आई होणे आणि अभिनय यांचा संबंध नाही अशी ती सांगते. करीना अनेक वेळेस आपल्या कामामुळे ट्रोल होते परंतु ती सुध्दा तेवढ्या बेधडक पणे त्या ट्रोलना उत्तर देते त्यामुळेच ती एक कुल आई आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@KhaasRe.com वर पाठवू शकता.