बातम्यांमध्ये कसं यायचं, लोकांचं लक्ष कसं वेधायचं किंवा सोशल मिडीयावर ट्रेंडमध्ये कसा करायचा याचा सोपा फॉर्म्युला कोणाला हवा असेल तर त्यांनी राखी सावंत सोबत संपर्क करायला हरकत नाही.
कारण परत एकदा राखी सावंतला सोशल मिडीयावर नकारात्मक प्रसिद्धी मिळवण्यात यश आले आहे. पाकिस्तानी झेंड्यासोबत टाकलेल्या एका फोटोवरुन लोक तिच्यावर चांगलेच भडकले. मात्र राखीने आपल्या अंदाजात एक व्हिडीओ टाकून त्या फोटोबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. जाणून घेऊया काय आहे हा विषय…
राखी सावंतने पाकिस्तानी झेंड्यासोबत का टाकले फोटो ?
दोन दिवसांपूर्वी राखी सावंतने पाकिस्तानी झेंड्यासोबत फोटोशूट करुन आपल्या इंस्टाग्राम हॅन्डलवर ते फोटो शेअर केले होते. राखीने त्या फोटोवर टाकलेले कॅप्शन न वाचताच लोकांनी तिला अत्यंत अश्लील भडक प्रतिक्रया दिल्या. राखीने त्यावर लिहले होते “मला आपला भारत देश आवडतो, परंतु हा माझ्या आगामी धारा-३७७ चित्रपटातील सिन आहे.” मात्र लोकांनी तिला ट्रोल केल्यानंतर राखीने व्हिडीओ टाकुन लोकांना उत्तर दिले.
व्हिडीओद्वारे राखीने काय दिले उत्तर ?
राखीने टाकलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, “हा एक पाकिस्तानी सेटअप आहे. या सिनेमाचे नाव धारा-३७७ असून तो काश्मीरमधील पंडितांवर आधारित आहे. त्यात मला पाकिस्तानी मुलीचा रोल आहे. या सिनेमात माझे पात्र छोट्या छोट्या मुलांना जिहादी बनवणाऱ्या आतंकवादी संघटनांचा पर्दाफाश करते. त्यात माझे एक आयटम सॉंग आहे. तुम्ही माझे फोटोतील कपडे पाहू शकता.”
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.