आपल्याला इमरान हाश्मीसोबत जन्नत २ मध्ये किंवा अक्षय कुमारच्या रुस्तुम मध्ये अभिनय करणारी ईशा गुप्ता ही अभिनेत्री माहित असेलच. नुकताच तिने आपल्यासमोर असा प्रश्न उपस्थित केला ज्याकडे कधी जास्त लक्ष दिले गेले नव्हते. तिचा प्रश्न आहे की, आपण नेहमी सावळ्या किंवा गव्हाळ रंगाच्या अभिनेत्रींना सेक्सी म्हणतो, त्यांना कधी सुंदर का म्हणत नाही ?
सावळ्या मुलींबाबत का केला जातो दुजाभाव ?
केवळ एखादी अभिनेत्री रंगाने सावळी असेल तर लोक केवळ अशा अभिनेत्रींनाच तिला सेक्सी म्हणत नाहीत, गोऱ्या अभिनेत्रींनाही सेक्सी संबोधले जाते. पण साधारणपणे गोऱ्या अभिनेत्रींना आपण सुंदर म्हणतो. कदाचित आपल्या डोक्यात सौंदर्याची कल्पना ही रंगासोबत जोडलेली असते. गोरा रंग म्हणजेच सौंदर्य असे आपल्याला वाटते. त्यामुळेच कुठलाही चित्रपट असो वा मालिका अभिनेत्रींचा रंग गोरा आणि निगेटिव्ह रोल करणाऱ्या महिलेचा रंग सावळा दाखवला जातो.
यशाने सांगितला सावळ्या मुलींसाठी कानमंत्र
एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ईशा गुप्ताने रंग आणि महिलांच्या शरीराबद्दल बरीच माहिती दिली. तीचं म्हणणं आहे की, “सावळ्या मुलींना आपण सुंदर समजत नाही हे आपली मानसिकता दाखवते. माझ्या भावाबहिणींमध्ये माझा रंग सावळा असल्याने माह्या मनात एक न्यूनगंड तयार झाला होता.
मी काळानुसार माझ्या शरीरावर प्रेम करायला लागले. एक सावळी मुलगी सुद्धा सुंदर असू शकते. केवळ फेअर मुलीच लव्हली नसतात, डार्क मुलीही लव्हली असतात. त्यासाठी आपण पूर्ण आत्मविश्वासाने वावरलं पाहिजे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.