काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी इंडिया टुडेला एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी देशविदेशातील अनेक मुद्यांवर चर्चा केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून ते महागठबंधन पर्यंत, प्रधानमंत्री मोदींपासून ते ममता बॅनर्जीपर्यंत आणि आतंकवादापासून ते काश्मीर प्रश्नापर्यंत विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली. याच मुलाखतीत आपण संसदेत नरेंद्र मोदींची गळाभेट का घेतली याचेही उत्तर त्यांनी दिले. जाणून घेऊया काय म्हणतात राहुल गांधी…
काय होते प्रकरण ?
२०१८ च्या जुलै महिन्यात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणापूर्वीच भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली होती. पण त्यानंतर राहुल गांधींनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी सरकारचे असे का वाभाडे काढले की देशात त्याची चर्चा झाली.
भाषणाच्या शेवटी त्यांनी सांगितले की, “भाजप, मोदी आणि संघाच्या मनात माझ्याबद्दल राग आहे. त्यांच्या दृष्टीने मी पप्पू आहे. ते लोक माझ्याविषयी अपप्रचार करतात. पण माझ्या मनात त्यांच्याविषयी अजिबात राग नाही.” एवढे बोलून राहुल गांधी थेट मोदींच्या जवळ गेले आणि त्यांनी मोदींची गळाभेट घेतली. या प्रकाराने काही वेळ मोदी, सत्ताधारी आणि विरोधकही चकित झाले होते.
का घेतली राहुल गांधींनी मोदींची गळाभेट ?
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत याविषयी राहुल गांधींनी सांगितले की, “नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र नीतीचा अर्थ जास्तीत जास्त नेत्यांची गळाभेट घेणे असा आहे. मी नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली होती, त्यात प्रेम होते. मी एक प्रधानमंत्री पाहिले ज्यांना गोष्टी हाताळता येत नाहीत. मी एक असे प्रधानमंत्री पाहिले ज्यांना देश चालवणे म्हणजे कुठले राज्य चालवण्यासारखे नसते हा अनुभव आला होता आणि ते त्यात फसले होते.
ते एकापाठोपाठ एक चुका करत सुटले होते. माझ्यावर रागवत होते. माझ्यावर ओरडत होते. मला त्यांची दया आली, त्यांच्याविषयी प्रेम जाणवले. मी सांगितले, मी तुमची गळाभेट घेणार आहे. म्हणून मी त्यांची गळाभेट घेतली. गळाभेट घेण्यामध्ये माझा त्यांच्यासाठी एक संदेश होता, ऐका मी तुमचा विरोधक आहे परंतु देशहितासाठी मी आपली मदत करायला तयार आहे. मी पुढे सरसावली पण त्यांनी मला दूर ढकलले.”
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.