मारामाऱ्या, खून आणि सिरीयल किलर अशा गोष्टी आपण क्राईम डायरीसारख्या मालिकांमध्ये बघतो. तीन तासांच्या चित्रपटातही खुनखराब्याचे प्रसंग पाहून आपल्या काळजाचा थरकाप उडतो. मात्र आज आम्ही आपल्याला वास्तव जगातील अशा ११ सिरीयल किलर्सच्या दहशतीबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या रानटीपणामुळे कधीकाळी अख्खा देश हादरून गेला होता.
१) मोहन कुमार – याला सायनाईड मोहन या नावानेही ओळखले जायचे. २००५ पासून २००७ पर्यंत याने २० महिलांना जीवे मारले होते. शिवाय हा अनेक बँक घोटाळ्यामध्ये सहभागी होता. २०१३ मध्ये याला फाशीची सजा सुनावण्यात आली.
२) देवेंद्र शर्मा – हा आयुर्वेदिक औषधांचा डॉक्टर होता. ज्यादा पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी याने गाड्या चोरी करुन ड्रॉयव्हरांना मारायला सुरुवात केली. याने २००२ ते २००४ दरम्यान गुडगाव, उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये अनेक काळे कारनामे केले. २००८ मध्ये याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
३) द निठारी किलर्स – मोहींदरसिंह पंढेर हा नोएडाचा मोठा उद्योगपती होता. २००५ ते २००६ यादरम्यान निठारी गावातून बेपत्ता झालेल्या १६ लहान मुलांचा शोध घेत असताना मोहींदरसिंह आणि त्याचा नोकर सुरींदर कोली या दोघांना अटक करण्यात आली होती. या दोघांवर बलात्कार, नरभक्षण, लैंगिक शोषण आणि अवयव तस्करीसारखे गंभीर आरोप होते. २०१७ मध्ये दोघांना फाशीची सजा सुनावण्यात आली.
४) चार्ल्स शोभराज – चार्ल्स शोभराजने दक्षिणी पूर्व आशियाच्या वेगवेगळ्या भागात १९७५ ते १९७६ यादरम्यान जवळपास १२ खून केले होते. आधी लोकांना मदत करून तो त्यांचा विश्वास जिंकायचा आणि नंतर त्यांचा खून करून तो त्यांना लुटायचा. त्याने बिकिनी घातलेल्या दोन महिलांचा खून केल्यापासून बिकिनी किलर म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याला भारतात पकडल्यानंतर १९७६ ते १९९७ पर्यंत तुरुंगात होता. २००४ मध्ये त्याला नेपाळमध्ये अटक करण्यात आली, आता तो आपली दुसरी जन्मठेप भोगत आहे.
५) के.डी.केम्पम्मा – हिला सायनाईड मल्लिका म्हणूनही ओळखले जायचे. १९९९ ते २००७ च्या दरम्यान तिच्यावर ६ महिलांच्या खुनाचा आरोप होता. ही मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना सायनाईड देऊन मारायची आणि नंतर त्यांचे सामान लुटून न्यायची. २००७ मध्ये तिला अटक करून आजन्म कारावासाची शिक्षा दिली आहे.
६) रेणुका शिंदे आणि सीमा गावीत – या बहिणींना त्यांच्या आईने लहान वयातच छोट्यामोठ्या चोऱ्या करायला शिकवले होते. त्यानंतर दोघींनी लहान मुलांचे अपहरण करायला सुरुवात केली. जी मुले यांना त्रास देतील त्यांना या मारून टाकायच्या. दोघींवर १३ अपहरण आणि ९ खुनांचा आरोप लावण्यात आला होता. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
७) ठग बेहराम – हा मध्य भारतातील कुख्यात अशा ठगी पंथाचा प्रमुख होता. लोकांना बंदी बनवून हा रुमालाने त्यांचे तोंड बांधायचा आणि गुदमरून त्यांना मारायचा. त्यांनतर त्यांना लुटायचा. असं सांगितले जाते की बेहरामने ९३१ लोकांचा खून केला आहे. पण त्याने आपण केवळ १२५ लोकांना मारल्याचे काबुल केले होते. १८४० मध्येच याला त्याच्या कृत्याबद्दल फासावर लटकवण्यात आले होते.
८) रमण राघव – याला “सायको रमण” असेही म्हणले जायचे. १९६० च्या दशकात मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारे लोक रमणच्या दहशतीत होते. लोकांना मारण्यासाठी तो वटवाघुळांचा वापर करायचा. त्याला अटक केल्यावर समजले कि त्याला Schizophrenia नावाचा रोग आहे. त्याने २३ लोकांच्या खुनाची कबुली दिली होती, १९९५ मध्ये किडनी फेल झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
९) एम.जयशंकर – एम.जयशंकर याच्यावर २००८ ते २०११ दरम्यान बलात्कार आणि खुनाचा आरोप होता. सांगितले जाते की त्याने तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात मिळून ३० बलात्कार, १५ खून आणि कित्येक दरोडे असे गुन्हे केले आहेत. त्याला अटक केल्यावर बंगळूरच्या तुरुंगात ठेवण्यात आले. त्याला मानसिक रुग्ण म्हणून घोषित करण्यात आले. तुरुंगातून पळून जाण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर त्याने २०१८ मध्ये आत्महत्या केली.
१०) दरबारा सिंह – दरबारा सिंह याच्यावर एप्रिल ते सप्टेंबर २००४ या दरम्यान १५ मुली आणि २ मुलांचा खून केल्याचे आरोप होते. तो लोकांचा गळा दाबून त्यांचा खून करायचा. त्यालयाबाबदल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, पण नंतर पुराव्याभावी त्याला सोडण्यात आले. त्यानंतर २०१८ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावतेवेळी त्याचा मृत्यू झाला.
११) अक्कू यादव – अक्कू यादव हा नागपूर भागातील स्थानिक गुंड होता. त्याचे वय केवळ ३२ होते. अनेक वर्षे त्याने आपल्या भागातील महिलांवर बलात्कार करून त्यांचा खून केला. नागपूर जिल्हा न्यायालयाच्या बाहेर २०० हुन अधिक महिलांनी त्याला मारले. त्याच्यावर दगड फेकले. एका महिलेने त्याचे लिंग कापून टाकले.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.