आपल्या संत तुकाराम महाराजांनी “ऐसें कैसे झाले भोंदू कर्म करोनि म्हणती साधु । अंगा लावुनिया राख डोळे झांकूनि करिती पाप । दावूनि वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा । तुका म्हणे सांगों किती जळो तयांची संगती ।।” इतक्या स्पष्ट शब्दात आपल्याला ढोंगी साधूंपासून दूर राहायला सांगितले आहे.
तरीही स्वतःला बाबा म्हणवून घेणाऱ्या अनेक साधूंच्या व्यभिचाराला बळी पडलेल्या अनेक निष्पाप स्त्रिया आहेत. अशाच एका बलात्काराच्या आरोपाखाली आसाराम आणि नारायणसाई हे पितापुत्र तुरुंगात आहेत. पण हे दोघेच नसून अजूनही पाच असेच बाबा लोक सुद्धा बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात कैद आहेत. जाणून घेऊया त्या लोकांबद्दल…
१) गुरमीत राम रहीम – हरियाणाच्या सिरसा, रोहटक आणि पंचकुलाच्या क्षेत्रात आपला व्यापक भक्त परिवार असणारे डेरा सच्चा सौदा या परिवाराचे संस्थापक गुरमीत राम रहीम सध्या बलात्कार आणि खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांपासून क्रीडा, उद्योग, सिनेक्षेत्रातील अनेक लोक त्यांच्यापुढे लोटांगण घालतात यावरून त्यांची लोकप्रियता लक्षात येते. सध्या ते रोहटकच्या सुनरिया जेलमध्ये कैद आहेत.
२) रामपाल – हरियाणामध्येच संत रामपाल नावाने प्रसिद्ध असणारे बाबा सतलोक नावाचा स्वतःचा आश्रम चालवत होते. या आश्रमाच्या वतीने बनवण्यात आलेल्या दवाखान्यात बेकायदीर गर्भपात करत असल्याचे पुरावे उजेडात आल्यानंतर पोलिसांनी आश्रमाची तपासणी केली. त्यात पोलिसांना अनेक बेकायदा शस्त्रे आणि आक्षेपार्ह औषधे सापडली. पोलीस अटक करायला आल्यानंतर रामपालांनी आपल्या भक्त परिवाराला जमा करून पोलिसांवर प्रतिहल्ले केले. रामपालांवर देशद्रोहापासून शारीरिक शोषणाचे खटले सुरु आहेत. सध्या ते हिसारच्या तुरुंगात कैद आहेत.
३) वीरेंद्र देव दीक्षित – दिल्लीच्या रोहिणी भागात असणाऱ्या आपल्या “अध्यात्मिक ईश्वरीय विश्वविद्यालय नावाच्या आश्रमात मुलींकडून अनैतिक देहव्यापार करत असल्याच्या आरोपांवरून पोलिसांनी मागच्या वर्षी त्यांच्या आश्रमाची तपासणी केली. आश्रमात अनेक बंदिस्त असणाऱ्या मुली सापडल्यानंतर पोलिसांनी त्यांचे आश्रम सील केले. त्यावेळी आश्रमात असणाऱ्या सर्व मुलींची पोलिसांनी सुटका केली. सध्या हे बाबा फरार असून त्यांचा ठावठिकाणा सांगणाऱ्यांना सीबीआयने पाच लाखांचे इनाम जाहीर केले आहे.
४) भीमानंद – स्वतःला इच्छाधारी संत म्हणून सांगणारे चित्रकूटचे भीमानंद स्वामी आपल्या नागीण डान्ससाठी प्रसिद्ध होते. आपल्या प्रवचनाच्या बहाण्याने जवळपास ६०० तरुण मुलींना भुलवून त्यांना देहाव्यापारात ढकलल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. २०१० मध्ये या कारणासाठीच त्यांना मोक्का अंतर्गत तुरुंगवास झाला. त्यांचे खरे नाव शिवमुरत द्वीवेदी होते.
५) परमानंद – तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली आश्रमातील परमानंद स्वामी उर्फ पुत्रप्राप्तीचा अपेक्षेने येणाऱ्या १३ महिलांवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली. त्यांना अश्लील पुस्तके आणि कामोत्तेजक औषधांचे सेवन करण्याचा विकृत नाद होता. त्यांचा एक सेक्स व्हिडिओही व्हायरल झाला होता. सध्या ते तिरुचिरापल्ली मधील तुरुंगात कैद आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.