करवीरनिवासिनी आदिमाया अंबाबाई म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी ! महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक ! तीन-चार वर्षांपूर्वी देवीच्या मूर्तीची झीज झाल्यामुळे तिच्यावर रासायनिक क्रिया करण्यात आली, तेव्हा देवीच्या मस्तकावर असणारी नागमुद्रा घडवली नसल्याचे लक्षात आले. त्यावेळेस कोल्हापूरची देवी ही अंबाबाई की महालक्ष्मी हा वाद उपस्थित झाला, त्या वादाच्या पार्श्वभूमीवर तिरुपती बालाजी देवस्थानकडून येणाऱ्या शालूची परंपरा बंद करण्यात आली. या प्रकरणाविषयी अधिक जाणून घेऊया…
देवीला बालाजी देवस्थानकडून येणार शालू बंद करण्यामागची भूमिका काय ?
साधारणपणे २०-२५ वर्षांपासून तिरुपती येथील बालाजी देवस्थानकडून नवरात्र उत्सवाच्या काळात कोल्हापूरच्या देवीला मानाचा शालू नेसवण्याची परंपरा सुरु होती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती तिरुपती देवस्थानला पत्र लिहून ही मागणी करायचे. मात्र कोल्हापूरची देवी ही महालक्ष्मी नसून अंबाबाई असल्याच्या वाद उपस्थित झाला.
कोल्हापूरच्या देवीला बालाजीकडून येणारा शालू विष्णुपत्नी या नात्याने येत होता, मात्र कोल्हापूरची देवी ही पार्वतीचे रूप असल्याने तिला विष्णुपत्नी या नात्याने शालू कसा नेसवता येईल असा प्रश्न उपस्थित करून कोल्हापूरच्या देवस्थान समितीने देवीला बालाजीकडून येणारा शालू नेसवण्याची परंपरा खंडित केली.
कोल्हापूरची देवी अंबाबाई की महालक्ष्मी ?
कोल्हापूरच्या देवीला आदिशक्ती करवीरनिवासिनी म्हटले जाते. कोल्हापूरच्या मूर्तीच्या हातात असलेली आयुधे नाग, सिंह, महाळुंग, नागमुद्रा ही देवी पार्वतीची प्रतीके आहेत. तसेच तिरुपतीच्या बालाजीची पत्नी अंबाबाई नसून पद्मावती असल्याचे इतिहास अभ्यासकांनी पुराव्यांसहित मांडले. पार्वती ही शिवाची पत्नी आहे.
जाणीवपूर्वक अंबाबाईचे महालक्ष्मीकरण करून तिला विष्णुपत्नी म्हणून दाखवणे चुकीचे आहे. अंबाबाईचे श्रीपूजक तिचा संबंध बालाजीसोबत दाखवून अंबाबाईचे नामकरण महालक्ष्मी करत आहेत असा आरोप देवस्थान समितीने केला आहे.
मूर्तीच्या मस्तकावर असलेली नागमुद्रा ही देवी पार्वती अर्थातच अंबाबाईचे प्रतीक आहे, मात्र देवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करताना ती नागमुद्रा घडवली नाही. या करवीरनिवासिनी अंबाबाई अनेकांचे कुलदैवत आहे, त्याचबरोबर कोल्हापूरकरांच्या श्रद्धेचा विषय आहे. आतापर्यंत देवीची मूळ ओळख पुराव्यांअभावी उजेडात नव्हती, मात्र वाद उपस्थित झाल्यानंतर अभ्यासकांनी कोल्हापूरची देवी अंबाबाईचा असल्याची भूमिका घेतली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.