सध्या प्रीवेडिंग शूटचा मौसम आला आहे प्रत्येकाचे स्वप्न आहे लग्न होण्या अगोदर आपल्या जीवनसाथी बरोबर एक सिनेस्टाईल गाणे शूट करायचे आणि फोटो सुध्दा आणि यामध्येच कधी कधी गोची उडते असाच काही प्रकार केरळला झाला केरळ हे पृथ्वीवरचे स्वर्ग किंवा देवभूमी अस आपण मानतो तिथे फोटोशूट चा आनंद वेगळाच आहे.
तुम्हाला आठवते का एक फोटोग्राफर जो झाडाला उलटा लटकला होता नवीन दाम्पत्याचे फोटो शूट करण्यासाठी असाच प्रकार देखील इथे आहे. हा व्हिडीओ Weddplanner Wedding Studio तर्फे सोशल मिडीयावर अपलोड करण्यात आलेला आहे. तीजीन आणि शिल्पा या दोघांचा हा फोटो शूट होता आणि हा शूट पंबा नदीच्या किनारी केरळ येथे घेण्यात आला.
मुळात या जोडीस माहिती नव्हते कि त्यांचा शूट हा बोट मध्ये घेण्यात येणार आहे. त्यांनी लिहलेले आहे कि त्यांचा मुख्य फोटोग्राफर रॉय लॉरेन्सची हि आयडिया होती आणि जो काही प्रकार घडला आणि फोटो निघाले ते अप्रतिमच आहे. त्यांच्या ऑफिशियल पेजवर या व्हिडीओ ला लाखो लोकांनी बघितले आहे.
खाली क्लिक करून आपण हा व्हिडीओ बघू शकता.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.