ज्या वयात लहान मुले आपल्या मम्मी पप्पांकडे खेळणी, मोबाईल, व्हिडीओ गेम्स मागतात, त्याच वयात थायलंडमधील घेऊया नॅथेनन नावाच्या एका १२ वर्षांच्या चिमुरडीने स्वतःच्या कमाई मधून आपल्या १२ व्या वाढदिवसानिमित्त स्वतःला क BMW Sedan कार गिफ्ट केली आहे. जाणून घेऊया नॅथेननच्या या अचाट यशाबद्दल…
नॅथेनन ही थायलंडच्या चन्थाबुरी इथली राहणारी असून एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. तिने “लंडन फॅशन वीक-२०१८” मध्ये सहभाग घेतला होता. लंडन फॅशन वीक मध्ये मेकअप करणारी ती सर्वात कमी वयाची मेकअप आर्टिस्ट आहे.
कशी बनली नॅथेनन मेकअप आर्टिस्ट ?
बातमीनुसासर नॅथेनन युट्युबच्या मदतीने मेकअप करायला शिकली. जेव्हा ती ७ वर्षांची होती तेव्हापासून तिचे मेकअप ट्युटोरियल्स सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर लोकांची नजर तिकडे गेली आणि नॅथेनन प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर नॅथेननने प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट बनण्यासाठी प्रोफेशनल मेकअपचे कोर्सेस देखील केले.
फेसबुकवर आहेत ९ लाख फॉलोवर्स
नॅथेननने ९ एप्रिलला आपल्या फेसबुक पेज वर आपली BMW कार घेतानाही पोस्ट शेअर केली होती. त्यात ती लिहते की, “मला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी १२ वर्षांची झाली आहे. आपल्या प्रेम आणि सहकार्यासाठी आभारी आहे.” आपल्या मेकअप आर्टिस्टच्या कामामुळे ती प्रसिद्ध असल्याने फेसबुकवर ९ लाखांहून अधिक लोकांनी तिला फॉलो केले आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.