निवडणूक ड्युटीवर असलेल्या एसआरपीएफ जवानांना वरिष्ठांकडून अमानुष वागणूक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या जवानांना देशात अशी वागणूक मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोटात अन्नाचा कणही नसताना तीन-तीन दिवस ड्युटी लावली गेली, शेकडो किमी प्रवास करावा लागला.
तरीही कोणतीही व्यवस्था न करता वरिष्ठ सुट्टीवर निघून गेले, असं एका जवानाने पोस्ट लिहून सांगितलंय. शिवाय या जवानांना नाईलाजाने रस्त्याच्या कडेला पेट्रोल पंपावर झोपावं लागलं. जवानांकडून जो फोटो शेअर करण्यात आलाय, त्याची खात्री खुद्द पेट्रोल पंप मालकानेच केली आहे.
एसआरपीएफ जवान जेव्हा एखाद्या ठिकाणी बंदोबस्ताला जातात, तेव्हा त्यांच्या जेवणाची आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था ही तेथील ठाणे अंमलदार किंवा स्थानिक प्रशासनाला करायची असते.
पण फोटो व्हायरल झाला त्या फोटोमध्ये जे दिसत आहे ते असेल तर ते खूपच दुर्दैवी आहे. कुठे तरी दिरंगाई झालेली दिसते. पण शक्यतो असं होत नाही. कारण, समजा एखाद्या ठिकाणी दहा जवान असतील, तर ते दहा जवान एकाच वेळेला ड्युटी करत नाहीत, तर पाळी-पाळीने ते तिथे ड्युटी करत असतात.
जवानाचं खुलं पत्र-
जय हिन्द मैडम.
मी गट 15 गोंदिया कैंप नागपुर नेमणूक E कंपनी
आम्ही दिनाक 10/04/2019 ला दुपारी 14.00 वास्ता चिचगड़ पोलिस स्टेशन निवडणूक बन्दोबस्त पार पाडून पुढील आदेशानुसार दिनांक 11/04/2019 ला सायंकाळी 18.00 वास्ता पुणे येथे बन्दोबस्त करिता रवाना झालो
तरी आम्ही नक्षल ड्यूटीवर असल्या कारणाने आम्ही तेथे आराम करू शकलो नाही
इलेक्शन ड्यूटी संपताच आम्ही बेस कैंप बोरगांव (गोंदिया)
येथे येताच आम्हाला 05 मिनिट सुद्धा आराम दिला नाही.
आणि लवकर पुणे ग्रामीण बन्दोबस्ताकरिता तत्काल निघण्याचे आदेश दिले.
आम्ही रात्रभर प्रवास केला.
तरी आम्हाला सकाळी 04.00 वास्ता पेट्रोल पंप ( कारंजा लाड) येथे थांबविले
तरी आम्हाला सकाळची विधी करायला वेळ ही दिला नाही
आम्ही कारंजा लाड पासून सकाळी 06.00 वाजता पुणे करिता निघालो
आज दिनांक 13/04/2019 वेळ 01.00 वाजून गेले तरीही आमच्या पोटात अन्न तर नाहीच पण सतत 03 दिवस झोप नाही.
सतत प्रवासाने आमची शारीरिक प्रकृति आणि मानसिक स्थिती खालवलेली असून अशा परिस्थितीत खाण्याची, जेवण्याची तसेच राहण्याची व्यवस्था न करताच वरिष्ठ अधिकारी परस्पर रजेवर निघुन गेले..
अधिकाऱ्यांनी सर्व कंपनीला जनावरासारखी वागणूक दिली .
याची नोंद घेण्यात यावी. ही नम्र विनंती
आमच्या हाल अपेष्टा खालील चित्रात दर्शवित आहो
वेळ 1.30am
दिनाक 13/04/2019.
महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.