निवडणुकीची रणधुमाळी उडालेली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार नवनवीन फंडे वापरत आहेत. त्यापैकी सिनेकलावंताना बोलावणे हा सुद्धा एक जुनाच फार्मुला आहे. अनेक मतदार सिनेस्टारला बघयला येतात. असेच काही अमरावती मध्ये झाले. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस च्या पाठींब्यावर या या लोकसभा मतदार संघातून सिने अभिनेत्री व आमदार रवी राणा यांची पत्नी नवनित कौर राणा दुसर्यांदा नशीब आजमावत आहे.
त्यांनि या अगोदर दही हंडीला अनिल कपूर, गोविंदा असे मोठे सुपरस्टार बोलवून चांगलीच गर्दी जमवली होती. सध्या त्या अपक्ष पाणा या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. त्यांची प्रचार सभा तिवसा येथे पार पडली या करिता त्यांनी सिने अभिनेता सुनील शेट्टी यांना बोलावले होते. रात्रीच्या वेळेस असलेल्या या सभेला सुनील शेट्टी यांच्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी जमवली.
आपला आवडता हिरोची एक झलक मिळण्याकरिता लोकांची झुंबड उडाली स्टेज वर चढण्या करिता काही लोक मागे पुढे पाहत नव्हते. सुनील शेट्टी येणार या करिता काही हवसे नवसे देखील आले होते. परंतु लोकांनी सुनील शेट्टी जो सिनेमात हजार लोकांना एकटा मारतो खरी गर्दी बघून घाबरला आणि लोकांच्या लोंढ्याचा विचार करून स्टेजच्या मागच्या बाजूने पळून गेला.
या प्रकारा नंतर चाहते नाराज झाले परंतु सुनील शेट्टीला विदर्भातील लोकांनी चांगलाच हिसका दाखविला असे बोलल्या जात आहे सदर घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण आम्हाला मिळालेले आहे. आपण हे चित्रीकरण खाली क्लिक करून बघू शकता.
बघा व्हिडीओ खाली