आजच्या तारखेला हिंदुस्तानात क्रमांक १ चा स्टार मल्ल पैलवान जसकवर वर सिंह उर्फ जस्सा पट्टीवाला
पंजाबी निवेदक आखाड्यात निवेदन देतो , ओ बल्ले बल्ले तलीया ला दो तालीया …..बात समय दि होनी है चलती हुयी कुश्ती इन नौजवान दे दरम्यान पट्टी वाला जस्सा….पट्टी वाला जस्सा है ओ जो एक बार मोडे दे गुटना रख देता है तो छड नही देता और छोटा सोनु , कमलजीत , रूबल साबा ….
आणी तोच पै जस्सा पट्टी महाराष्ट्रात पहिल्यांदाच वारणा मैदानात आला होता त्या वेळेस चालत बोलत कुस्तीचे विदयापीठ गुरुवर्य पै शंकर पुजारी यांनी त्याच वर्णन केल होत, हा बघा आला उत्तरेतील पंजाबचा महान मल्ल उंचपुऱ्या देहयष्टीचा भिमाकाय शरीर लाभलेला एक तुफानी पैलवान हिंदुस्थानात क्रमांक १चा मल्ल पै जस्सा पट्टी मैदानात आला जरा टाळ्या होऊ द्या टाळ्या .
यहा कोई आली करके आता है तो कोई बजरंग बली या कोई बोले सोणीहाल यहा मजहब कोई भी हो सबका मकसद एक ही अवघा झाला एकची रंग , अवघा झाला एकची रंग कुस्ती म्हणजे कुस्ती हाय येथे जातीचेच पैलवान पाहिजे एड्या गबाळ्याच काम नव्ह, ते शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी .वरून खालुन तोलुन मापुन बनलेला मंडळी त्याचे मांड्या बघा मांड्या पट बगन्यासारखेच आहेत आनी आपल्या पोरांचे बगा कुळवाच्या दांड्या हा घरात राबवण्याच्या कार्यक्रम आहे इथंच बगून सोडु नका ……अस मंत्रमुग्ध करणार निवेदन .
नाव – जसकवर सिंग उर्फ जस्सा पट्टी .
गाव – चुस्लेवाडा ता पट्टी सध्या तरन तारन अमृतसर येते वास्तव .
कुस्तीचे बाळकडु विरासत मदे वडलांच्या कडुन पै सल्वीण्दर सिंघ उर्फ शिंदा पैलवान पट्टीवाला यांच्याकडुन मिळाले .वडील पट्टी आखाड्यात होते म्हणुन त्यांना पट्टीवाला शिंदा या नावाने ओळख निर्मान झाली आनी तोच दर्जा त्याला मिळाला जस्सा पट्टीवाला .
शिक्षन १०वी पर्यंत दिल्ली पब्लिक स्कूल ग्रेजुयेट गुरु नानकदेव यूनिवर्सिटी मधुन पूर्ण केले .त्यानं कुस्तीला सुरवात ८,९व्या वर्षी सुरवात केली .प्रचंड मेहनतीच्या जोरावर १४व्या वर्षीच आखाड्यात उतरला त्याचे सर्व श्रेय त्याचे गुरु वस्ताद भाना सिंह उर्फ भाना पैलवान यांना देतो म्हणुनच आजच्या तिथीला हिंदुस्तानात क्रमांक १चा मल्ल आहे .
पैलवान रोहित पटेल उर्फ लड्डु पैलवान आणी कमलजीत डुमछडी यांना रोल मॉडल मानतो , पै रोहित पटेल यांना बघुनच त्याने आपल्या पटाची तयारी केली.
आजच्या तारखेला त्यानं असा कोणताही मल्ल नसेल त्यच्या बरोबर कुस्ती केली नसेल पै रुबाल खन्ना, साबा कोहली , मौसम खत्री , गौरव माचीवाडा, बेणीया आमिन , प्रिंस कोहली, वरून गुज्जर , अजय बरान , पम्मी डेरा बाबा नानक , छोटा सोनु , हितेश काला , सुनील झीरकपुर , किरण भगत, कमलजीत , प्रवीण चिका , अशा कितीतरी मातब्बर पैलवान चित केले .आजपर्यंत त्याच्यावर कितीतरी ईनामांची कमाई झाली.
त्यात, {१}२०१५साली इंडियन युनिवर्सिटी कांस्यपदक {२}२०१६ साली ऑल इंडिया इंटर युनिवर्सिटी गोल्ड{३} ८० च्या वर मोटारसायकली त्यामध्ये २०च्या वर बुलेट . {४} ४ फोर व्हिलर ,एक tractor , {५} ५०ते ६०म्हशी जिंकल्या आहेत .तरीही त्याचे पाय जमीनीवर आहेत . कसलंही घमंड नाही तो बोलतो आदमी को घमंड नही करना चाहिए मेरे से पहले भी थे आज भी है कल भी आएंगे .
असा हा विनयशील विनम्र पैलवान ज्या वेळेस आखाड्यात उतरतो तेव्हा जनसागराचा महासागर होतो , चाहत्या वर्गाच्या आनंदाला पारावर उरत नाही .काही तर त्याचे एवढे प्रेमी आहेत जस्सा अगर जखमी असेल तर तो ठीक होईपर्यंत कुस्ती बघायला सुध्दा जात नाहीत .अशीच त्याच्या हातुन कुस्तीची सेवा घडत राहो महाबली हनुमंताचे आशीर्वाद कायम राहुदेत त्यच्या पुढील वाटचालीस कुस्ती मल्लविद्या महासंघ परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या कडुन खुप खुप शुभेच्छा
लेखन प्रेरणा,
वस्ताद पै गणेश मानुगडे
ज्ञानेश्वर राऊत
कुस्ती मल्लविद्या महाराष्ट्र .
Kustimallavidya कुस्ती-मल्लविद्या
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.