भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचे नातू आणि संजय-मेनका गांधी यांचे पुत्र वरून गांधी हे सध्या भाजपचे सुल्तानपूरचे खासदार आहेत. तसेच ते भाजपचे राष्ट्रीय महासचिव देखील आहेत. वरून गांधी हे भाजपच्या इतिहासात सर्वात कमी वयाचे राष्ट्रीय महासचिव आहेत. यापूर्वी १५ व्या लोकसभेत देखील ते पिलिभीतचे खासदार राहिले आहेत.
खासरेवर जाणून घेऊया घरात तीन-तीन पंतप्रधान असलेला गांधी घराण्यातील राजकुमार ते सुल्तानपुरचा भाजप खासदार असा संपूर्ण जीवनप्रवास
वरून गांधी यांचा जन्म १३ मार्च १९८० रोजी दिल्लीमध्ये झाला. वरून अवघ्या तीन महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. संजय गांधी यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले होते. पुढे ते ४ वर्षाचे असताना त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांची हत्या झाली.
वरून गांधी यांचे प्राथमिक शिक्षण मॉडर्न स्कुल नवी दिल्ली येथून झाले. पुढे चौथीपासूनचे शिक्षण ऋषी वैली स्कुल आंध्र प्रदेश येथे झाले. पुढच्या शिक्षणासाठी ते पुन्हा ब्रिटिश स्कुल दिल्ली येथे गेले. वरून यांनी त्यांचे बीएससी इकॉनॉमिक्सचे शिक्षण लंदन स्कूल ऑफ इकनॉमिक्स येथून पूर्ण केले.
राजकीय मैदानात ते पहिल्यांदा १९ वर्षाचे असताना पिलिभीत येथे आईचा प्रचार करताना दिसले. त्यानंतर त्यांनी सतत प्रचारात आणि सभांमध्ये आईसोबत भाग घेतला आणि लोकांसोबत आपली ओळख करण्यास सुरुवात केली.
पुस्तकं वाचनाची आवड असणाऱ्या वरून यांनी २० व्या वर्षी ‘द ऑथनेस ऑफ सेल्फ’ हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाच्या प्रकाशनाला देशातील अनेक मोठे नेते उपस्थित होते. ते कवितासोबत राष्ट्रीय सुरक्षा आणि बाहेरील संबंधांवर लिहीत राहिले.
वरून हे त्यांची स्वतःची ओळख निर्माण करू इच्छित होते. त्यांना असलेला मोठा राजकीय वारसा बघून लोकांनी त्यांना ओळखावे हे त्यांना नको होते. त्यांना गांधी परिवारातील सदस्य म्हणून किंवा सोनिया गांधींच्या घरातील व्यक्ती म्हणून ओळख नको होती.
संजय गांधी यांच्या निधनानंतर मेनका गांधीनी संजय विचार मंच नावाने पक्ष तयार करून १९८४ मध्ये निवडणूक लढवली होती. जनता पक्षाच्या उदयानंतर त्यांचं भाग्य उजळलं. पुढे त्या भाजपमध्ये दाखल झाल्या.
२००४ मध्ये त्यांना भाजपने स्टार प्रचारक केले. पण त्या निवडणुकीत त्यांनी आपले भाऊ-बहीण राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काकी सोनिया गांधी यांच्या विरोधात बोलण्यास नकार दिला. पुढे नोव्हेंबर २००४ मध्ये त्यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेण्यात आले.
मेनका गांधी यांनी वरून यांच्यासाठी २००९ मध्ये आपली पिलिभीत लोकसभेची सीट सोडली होती आणि त्या शेजारच्या ओंला सीटवर उभ्या राहिल्या होत्या. वरून तिथून निवडून येत खासदार बनले होते. ऑगस्ट २०११ मध्ये अण्णा हजारेंच्या लोकपाल विधेयकासाठीच्या आंदोलनाला सरकारने परवानगी नाकारल्यानंतर वरून यांनी अण्णांना आपल्या सरकारी बंगल्यावर आंदोलन करण्यास सांगितले होते.
मार्च २०१३ मध्ये वरून गांधी यांची तत्कालीन भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय महासचिव म्हणून नेमणूक केली. आणि ते सर्वात तरुण महासचिव बनले. वरून गांधी हे सध्या भाजपचे सुल्तानपूरचे खासदार आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.