वरून गांधी हे राहुल गांधी यांचे चुलत भाऊ आणि सोनिया गांधींचे पुतणे आहेत. गांधी परिवारातील सदस्य असलेल्या वरून गांधी यांनी गांधी परिवाराबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सोनिया आणि राहुल यांना खूप दुःख होऊ शकतं. वरूनचं हे वक्तव्य त्यांना बिलकुल आवडलं नसेल. भाजपमध्ये असलेले वरून गांधी हे सुलतानपूरचे खासदार आहेत. यावेळी ते आपल्या आईच्या जागेवर म्हणजेच पिलिभीत येतुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
त्यांनी प्रचारादरम्यान एक वक्तव्य केलं जे गांधी परिवारासाठी एकप्रकारे मोठा शाब्दिक हल्ला मानले जात आहे. वरून गांधी हे नेहमी आपल्या भाषणात गांधी परिवाराच्या विरोधात भाष्य करण्यास टाळतात. पण यावेळी त्यांनी आपल्या परिवाराविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. पिलिभीत येथे एका सभेला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
वरून सभेत बोलताना म्हणाले, ‘विश्वनाथ प्रताप सिंह हे एक मोठे राजा होते. नरसिम्हा रावजी पण मोठे हस्ती होते. वाजपेयीजी हे सामान्य कुटुंबातून होते. पण त्यांनी याप्रकारची गरिबी कधी नाही बघितली. मोदीजी तर सामान्य पेक्षा गरीब घरातून आहेत. व्यक्तीचे धाडस बघा. मी तुम्हाला खरं सांगू, माझ्या कुटुंबातील व्यक्ती देखील पंतप्रधान राहिले आहेत. पण मोदीजींनी जो सन्मान देशाला दिला आहे तो इतर कोणीही दिला नाहीये.’
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पाच वर्षात एकदेखील भ्रष्टाचाराचा डाग नाहीये नरेंद्र मोदी यांच्यावर. तुम्हाला माहिती आहे राजकारण कसलं घाणेरडं असतं. सहा महिन्यात भ्रष्टाचाराचे आरोप करायला सुरु होतात. मोदी यांच्यावर मात्र चोरीचा आरोप नाहीये. कारण ते चोरी करतील तरी कोणासाठी त्यांच्या कुटुंबात इतर कोणी सदस्य देखील नाहीयेत. तो व्यक्ती फक्त देशासाठी जगत आहे. तो देशासाठी मरेल सुद्धा. त्यांना केवळ देशाची चिंता आहे.’
वरून गांधी यांच्या कुटुंबातील पंतप्रधान-
वरून गांधी यांचे हे शब्द ऐकून गांधी परिवारातील सदस्यांना नक्कीच दुःख झालं असेल. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान बनले. ते वरून गांधींचे पणजोबा होते. नेहरू हे १९६४ पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. पुढे १९७७ वरूनच्या आजी १९७७ पर्यंत पंतप्रधान राहिल्या. पुढे पुन्हा इंदिरा गांधी १९८० ते १९८४ पर्यंत पंतप्रधान राहिल्या.
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर वरून गांधी यांचे चुलते राजीव गांधी हे पंतप्रधान बनले. म्हणजेच वरून गांधी यांच्या कुटुंबातील तीन तीन व्यक्ती पंतप्रधान राहिले आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.