मागील काही वर्षांमध्ये भारतीय टीमचा क्रिकेट विश्वात दबदबा राहिला आहे. पुरुष क्रिकेट संघासोबतच महिला संघानेही दमदार कामगिरी मागील काही वर्षात केली आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने सर्व मोठे चषक जिंकले. तर आताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली देखील भारताची घोडदौड सुरूच आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांना त्यांच्याच भूमीत नमवण्याचा पराक्रम नुकताच विराटसेनेने करून दाखवला, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत भारतीय महिलांनीही न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. भारतीय पुरुष संघाप्रमाणेच मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महिला संघानेही आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
सध्या भारतात आयपीएलची धामधूम सुरू आहे. क्रिकेटचे चाहते आयपीएलवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रेम करतात. आयपीएलच्या निमित्ताने क्रिकेट विश्वाला एक आगळावेगळा सामना बघायला मिळणार आहे.
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यात मिताली राज, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमुर्ती या महिला क्रिकेटपटूंसह विराट कोहली एक संदेश देत आहेत. त्यात आगामी काळात महिला व पुरुष एकाच संघातून एकत्र खेळताना दिसतील असे सांगण्यात आले आहे. लवकरच आपल्याला कोहली आणि मिताली राज एकाच संघातून खेळताना दिसणार आहेत.
#ChallengeAccepted या मोहीमे अंतर्गत प्रथमच महिला व पुरुष खेळाडूंचा समावेश असलेल्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे. क्रिकेटमध्ये हा एकप्रकारे इतिहास घडणार आहे. पहिल्यांदाच भारतीय प्रेक्षकांना भारताच्या या स्टार खेळाडूंना सोबत खेळताना बघता येणार आहे.
बघा व्हिडीओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.