भारतीय टीमचा क्रिकेटविश्वात चांगलाच दबदबा आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने वनडे आणि टी-20 वर्ल्डकप व अनेक ऐतिहासिक सामने जिंकले. धोनी त्याच्या फलंदाजीमुळे सर्वाना आवडायचाच. पण त्याच्या साधेपणामुळे तो चाहत्यांच्या प्रचंड लाडका बनला.
धोनीचा मैदानावरील वावर वेगळाच असायचा. त्याच्या मैदानावरील असण्याने टीम इंडिया आत्मविश्वासाने सामने खेळते. पण धोनीवरचं प्रेम वाढण्याचं कारण ठरलं त्याच एखादी मालिका किंवा वर्ल्डकप जिंकल्यानंतर ट्रॉफी युवा खेळाडूंना देऊन कोपऱ्यात जाऊन उभे राहणे. या गोष्टीचा अनुभव आजपर्यंत अनेकदा आपल्याला आला आहे.
मालिका जिंकल्यानंतर सेलिब्रेशनच्या वेळी धोनी गायब असतो. तो युवा खेळाडूंना ट्रॉफी देऊन एका कोपऱ्यात उभा राहतो. कधी कधी तो एवढा मागे उभा राहतो कि तो फोटोमध्ये सुद्धा दिसत नाही. सेलेब्रेशनच्या फोटोमध्ये धोनीला अक्षरशः शोधावे लागते.
धोनी आयपीएल २०१८ मध्ये हैद्राबाद विरुद्ध विजय मिळवल्यानंतर देखील अशाप्रकारे गायब झाला होता. आणि नंतर त्याने मुलगी जीवासोबत सेलिब्रेशन केले होते. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ त्यावेळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले होते. पण आता आपण खासरेवर जाणून घेऊया धोनी टीमच्या सेलिब्रेशनच्या वेळी नेहमी मागे का असतो?
धोनीला याविषयी एकदा प्रश्न विचारण्यात आला होता. तो सेलिब्रेशनच्या वेळी नेहमी मागे का असतो. त्यावर धोनीने दिलेले उत्तर त्याच्याप्रती अजून सन्मान वाढवणारे होते. धोनीच्या मते पूर्ण टीम एखादा सामना किंवा मालिका जिंकते. त्यामध्ये संपूर्ण टीमचे योगदान असते. मग ट्रॉफी घेण्यासाठी एकदा कॅप्टन जाणे हा अन्याय आहे. त्यामुळे धोनी ट्रॉफी घेतल्यानंतर ती टीममधील खेळाडूंकडे सोपवून कोपऱ्यात जाऊन उभा राहतो.
धोनीच्या मते जिंकल्यानंतर सेलिब्रेशन नक्की केलं पाहिजे पण तुम्ही कर्णधार आहेत म्हणून सारखं तुम्हीच ट्रॉफी घेऊन बसणं चुकीचं आहे. टीममधील इतर खेळाडूंकडे दिल्याने त्यांचे देखील मनोबल वाढते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.