Android 8.0 ओरियो (ORIO) मोबाईलचे नवीन अपडेट काय आहे विशेष गोष्टी…
गुगलनि त्याचे नवीन Android अपडेट याची औपचारिकरित्या घोषणा केली नवीन अपडेट असेल Android 8.0. यातील विशेष गोष्टी गुगलनि त्याच्या लाइवस्ट्रीम मध्ये सांगितल्या जर तुम्ही Developer Preview करिता नोदणी केली असेल तर या सुविधा तुम्ही वापरूहि शकता..
आम्ही शोध घेतला काय असेल या अपडेटच्या विशेषतः यात सापडलेल्या महत्वाच्या तीन बाबी आपल्या समोर देत आहो खासरे वर,
या अपडेट मुळे मोबाईलची बैटरी जास्त काळ टिकेल
Android 8.0 मध्ये background process वर चांगले काम करण्यात आले आहे त्यामुळे तुम्हाला मिळेल जास्त काळ टिकणारी मोबाइल फोनची बैटरी. ज्या वेळेस एखादे अनावश्यक app आपली बैटरीचे आयुष्य कमी करत असेल Android 8.0 स्वतः हे app बंद ठेवणार.
या करिता प्ले स्टोर वर अनेक app आहेत परंतु 8.0 मध्ये पहिले पासून हि सुविधा असल्याने तुम्हाला कुठलेही बाहेरील app डाऊनलोड करायचं काम नाही. खालील विडीओ मध्ये सविस्तर सांगण्यात आले आहे नक्की बघा
पासवर्ड आठवण ठेवण्याची गरज नाही
प्रत्येक वेबसाईटला आपला वेगळा पासवर्ड असतो आता 8.0 मध्ये तुम्हाला पासवर्ड आठवण ठेवण्याची गरज पडणार नाही. कुठलेही बाहेरील app डाऊनलोड करयाची तुम्हाला गरज नाही स्वतः 8.0 तुमचे पासवर्ड सेव ठेवेल आणि हे विश्वसनीय आहे.
विडीओ सुरु असताना इतर कामे करता येतील..
विडीओ बघताना तुम्हाला इतर कामे करता येत नाही परंतु नवीन अपडेट मध्ये आपण विडीओ बघताना इतर कामेही करू शकसाल. या सुविधेला त्यांनी नाव The picture-in-picture mode हे दिल आहे.
होम बटन दाबताच विडीओ स्क्रीन लहान होणार आणि तुमचे काम विडीओ बघताना तुम्ही करू शकसाल.
App install करायची कटकट आता राहणार नाही. तुम्ही Browser मधून डायरेक्त app उघडू शकसाल.
आपला DATA या अपडेट मुळे अधिक सुरक्षित राहणार आहे.
तुम्हाला व्यक्त होण्याकरिता नवीन एमोजी या अपडेट मध्ये देण्यात आली आहेत.
या व्यतिरिक्त अधिक माहिती तुम्हाला खालील मराठी Tech विडीओ मध्ये मिळेल नक्की बघा
हे आहेत काही खास Android 8.0 Orio च्या विशेष गोष्टी आज रात्री १२.१० मीनटाने हे अपडेट तुम्हाला मिळू शकेल…
वाचा BitCoin म्हणजे काय व कमवा…
Comments 1