सध्याच्या काळात मुलाबाळांना चांगले शिक्षण देऊन सक्षम बनवणे आईवडिलांवरील फार मोठी जबाबदारी आहे. सर्वसामान्य लोक आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये शिकवतात. ज्या लोकांची कमाई थोडी चांगली असते ते आपल्या मुलांना एखाद्या चांगल्या खाजगी शाळेत शिकवतात. परंतु सेलेब्रिटी लोक आपल्या मुलांना शिकवण्यासाठी विशेष अशा स्कुलला प्राधान्य देतात. अशा सेलेब्रिटी लोकांच्या मुलांना शिकवण्यासाठीच मुंबईत एक स्कुल आहे. या स्कुलची फी इतकी आहे की केवळ अब्जाधीश लोकच त्यांच्या मुलांना इथे शिकवू शकतात.
कोणते आहे ते स्कुल ?
देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या वडिलांच्या आठवणीत मुंबईच्या बांद्रामध्ये एक स्कुल उभे केले आहे, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुल ! या स्कुलमध्ये प्रवेशासाठी इतकी फी आहे की तुम्हला विश्वास बसणार नाही. हे देशातील सर्वात टॉप रेटेड स्कुल आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीजचे हे फेव्हरेट स्कुल आहे. याठिकाणी शाहरुख खानचा मुलगा अबराम, ऐश्वर्या रॉयची मुलगी आराध्या, सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन अशा अनेक सेलेब्रिटीजची मुले शिकली आहेत.
कसे आहे नेमके हे स्कुल ?
२००३ मध्ये हे स्कुल सुरु झाले. स्कुलची इमारत सात मजल्यांची आहे. हे स्कुल खास करून International Baccalaureate या आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील कोर्सवर आधारित शिक्षण देते. या स्कुलमध्ये मल्टिमीडिया प्रोजेक्टर, विस्तृत गार्डन आणि मैदान आहे. प्रत्येक वर्गात माईक सिस्टीम, डिस्प्ले आणि बोर्ड, विद्यार्थ्यांसाठी लॉकर, ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा आणि एसी सुविधा आहे. “स्वप्न पाहण्याची हिम्मत करा सर्वोत्कृष्ट बनायला शिका” असे या स्कुलचे ब्रीदवाक्य आहे.
किती आहे या स्कुलची फी ?
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलचे संचालन नीता अंबानी करतात. देशातील टॉप टेन रँकिंगमध्ये या स्कुलचा समावेश आहे. या स्कुलला “नंबर वन इंटरनॅशनल स्कुल”चा किताबही मिळाला आहे. २०१७ मधील एका वृत्तानुसार इथे LKG पासून चौथीपर्यंतची फी २.०५ लाख रुपये, पाचवी ते सातवीपर्यंतची फी २.१ लाख रुपये, आठवी ते दहावी (ICSE बोर्ड) पर्यंतची फी २.३ लाख रुपये, आठवी ते दहावी (IGCSE बोर्ड) पर्यंतची फी ५.९ लाख रुपये, अकरावी आणि बारावी (IBDP बोर्ड)ची फी ९.६५ लाख रुपये होती.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.