बदाम खाण्याचे गुणकारी फायदे नक्की वाचा..

रात्री बदाम भिजवून ठेवा आणि सकाळी उठून खावे हा सल्ला अनेक लोक देत असता. बदाम भिजवल्यानंतर नरम होतात आणि पचण्यास सोईस्कर असतात. तसं तर बदामाला 5 – 6 तास भिजवून ठेवण्यात येत पण काही लोक रात्री भिजवून सकाळी त्याचे सेवन करतात. सुका मेवा हा तेलकट आणि चरबी वाढवणारा असतो असे लोक मानतात. असे असले तरी शेंगदाणे आणि काजू सोडल्यास अन्य प्रकारचा सुका मेवा चरबी वाढवत नाही.

बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते असे नेहमी म्हटले जाते. बदाम खाल्ल्याने फक्त स्मरणशक्तीलाच नाही तर अजून अनेक फायदे होतात. बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिने असल्यामुळे बदाम शरीराला फार उपयुक्त आहे. बदाम हा स्मरणशक्ती द्रृढ करण्यासाठी फायदेशीर आहे. त्याच बरोबर बदाम नियमित खाल्ल्याने डोळे तेजस्वी होतात. बदामाचे नियमित सेवन केल्याने त्याचे बरेच फायदे होतात.

चला बघूया खासरे वर नियमित बदाम सेवन केल्याचे फायदे..

भिजलेल्या बदामाचे सेवन केल्याने गर्भातील शिशूच्या मस्तिष्क आणि न्यूरोलॉजिकल सिस्टमला फायदा होतो. कारण यात फॉलिक ऍसिडची भरपूर मात्रा असते.

अनेक संशोधनात सिध्द झाले आहे की, भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. कारण भिजवलेल्या बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.

भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले तर त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात.

बदामांच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. रात्री झोपतांना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतले तर सर्दी कमी होते.

बदामातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृद्यावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृद्यविकारांपासूनही बचाव होतो. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश अवश्य करावा.

रोज नेमाने बदाम खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहत. भिजलेले बदाम खाल्ल्याने रक्तात अल्फाल टोकोफेरॉलची मात्रा वाढते, जी एक सामान्य ब्लड प्रेशरला व्यवस्थित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावते.

वजन कमी करायचे असल्यास नियमित भिजवलेले बदाम अवश्य खावेत. एका संशोधनात समोर आले आहे की, बदामात कॅलरी कमी असतात यामुळे याचा त्याचा आहारात समावेश करावा. बदामामुळे पचन सुधारते, वारंवार लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते.

नेहमी आमचे कुटुंबातील मोठे लोक स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खाण्याचे सल्ला देत आले आहे. वैज्ञानिकांचे देखी असे मानणे आहे की रोज बदामाचे सेवन केल्यानं स्मरणशक्ती मजबूत होते.

मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्ल्यास त्यांची शुगर लेवल नियंत्रणात राहते.

बदामाची साल कोरडी असल्याने सहसा लोक ती काढून टाकतात. पण ही साल शरीरातील रक्त पातळी वाढवण्यास मदत करतात. म्हणून बदाम हे सालासकट खाल्ले पाहीजेत.

केसांच्या आरोग्यासाठी देखील डॉक्टर्स रोज बदाम खाण्याचा सल्ला देतात.

बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. जे रक्त शुध्दीकरण करण्यास उपयुक्त आहे.

गरोदर स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खाणे तिच्यासोबतच गर्भाच्या वाढीसाठीदेखील फार आरोग्यदायी आहेत. बदामातील फॉलिक अ‍ॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ करण्यास मदत करतात. भिजवलेले बदाम मऊ असल्याने गरोदर स्त्रियांना सहज पचायला शक्य असतात.

बदामाच्या सेवनाने केस गळण्याचे प्रमाणही कमी होते.

एवढे सारे गुण बदाम खाल्ल्यामुळे मिळतात. चला तर मग बदाम खाऊया आणि स्वस्थ राहूया…
शेअर करायला विसरू नका…

क्लिक करा व वाचा कोमट पाणी पिण्याचे फायदे

क्लिक करा व वाचा लैंगिक क्षमता वाढविण्याचे घरगुती उपाय..

Comments 1

  1. गौरव कोठारी says:

    नमस्कार,
    गेले काही दिवस मी तुमचे लेख वाचतोय. लेखांचे विषय योग्य असतात फक्तं त्या विषयी जरा योग्य माहिती लिहित जा. म्हणजे विषयाचा अभ्यास करायची गरज आहे लिहिणार्याला. आत्ता बदामाच्या लेखा विषयी…

    आपण असे लिहिले आहे कि बदाम भिजवून, सालीसकट खाल्ले पाहिजे. बहुतेक वेळी साल कडक असल्यामुळे लोक साल काढून टाकतात. तर असा आहे, कि न भिजवता बदामची साल काढणा खूप कठीण असत. न भिजवलेले बदाम सालीसकट खातात. ती साल काढता यावी म्हणून बदाम ५-६ तास भिजवले जातात.

    बदामाच्या साली मध्ये tanin असत. हे tanin आतल्या पांढर्या भागाला साव्रक्षण देत असत. जेव्हा आपण बदाम साला सकट खातो तेव्हा tanin पोटात जाता. आणि आपण tanin पचवू शकत नाही. म्हणून बदामाचे सगळे पोषक गुण आपण घेऊ शकत नाही. भिजवल्या मुळे बदामाची साल आरामात काढता येते व tanin विरहित बदाम खाल्ल्यामुळे सगळे पोशाक्तात्त्वे शरीराला मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.