बाबा गुरमीत राम रहीम सिंह
राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील गुरुसर मोदिया येथे एका शीख कुटुंबात ते जन्माला आले. वयाच्या सातव्या 31 मार्च, 1974 रोजी तत्कालीन डेरा प्रमुख शाह सतनाम सिंह यांनी राम रहीम असं त्यांचं नाव ठेवलं.
23 सितंबर, 1990 रोजी शाह सतनाम सिंह यांनी देशभरातील अनुयायांचं सत्संग बोलावलं आणि गुरमीत राम रहीम सिंह यांना आपला उत्तराधिकारी घोषीत केलं. राम रहीम यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांनी दोन मुलींशिवाय हनीप्रीत हिला दत्तक घेतलं आहे.
यांच्या विषयी वेगवेगळे वाद आहेत बलात्कारापासून खुनाचे व खुनाच्या प्रयत्नाचे आरोप आहेत. ४०० पुरुष अनुयायांची जबरदस्ती नसबंदी केल्याचा आरोप हि त्यांच्यावर आहे कारण आश्रमातील साध्वीसंदर्भात अनुयायांना लैंगिक आकर्षण वाटू नये.
सध्या या प्रकरणामुळे हरियाना जळत आहे स्ध्यापार्यंत २८ लोक मृत आहे असा आकडा समोर आलेला आहे. ३ रेल्वे स्टेशन अनुयायांनी जाळून टाकले आहेत.
अलीकडेच बाबा राम रहीम ने आपला ५० वा वाढदिवस साजरा केला व त्या वाढदिवसाला ५१०० किलो वजन असलेला केक कापला. ७०० एकर जमीन बाबा रहीमच्या नावाने आहे. बाबा राम रहीम हे स्वतः कार डिजाईन करून बनवून घेतात व ह्या सर्व आलिशान कारचे कलेक्शन बाबा कडे आहे. खालील फोटोत आपण राम रहीमच्या गाड्याचा संग्रह बघू शकता…
अश्या वादग्रस्त विषयी बाबा आम्ही घेऊन आलेलो आहे काही माहिती खासरे वर
काय आहे प्रकरण
डेराच्या एका महिला साध्वीने २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंजाब-हरियाणा न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र लिहून बाबा राम रहीमवर बलात्काराचे आरोप केले होते. तिच्यासोबत व अन्य अनेक साध्वींसोबत बलात्कार झाल्याचा दावा तिने केला होता. यानंतर न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआय चौकशी पुर्ण झाल्यावर सीबीआयने डेरा प्रमुखावर बलात्कार व जबरदस्ती केल्याचे आरोप लावले होते.
डेरा सच्चा सौदा व त्याचा प्रमुख बाबा राम रहीम संदर्भात असलेले वाद
१९९८ मध्ये डेराच्या गाडीखाली येऊन एक मुलगा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणाच्या वार्तांकनानंतर पत्रकारांना बाबा राम रहीमच्या समर्थकांकडून धमक्या देण्यात आल्या होत्या.
२००२ मध्ये साध्वीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
२००२ मध्ये पत्रकार रामचंद्रच्या हत्येचा आरोप आहे.
२००३ मध्ये डेरा सच्चा सौदाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य रणजीत सिंह यांचे हत्याकांड घडले होते.
२००७ मध्ये गुरु गोविंद सिंह यांच्या वस्त्रांवरुन शिखांसोबत वाद निर्माण झाला होता.
२००७ मध्ये पंजाबमध्ये प्रदर्शन करणाऱ्या शिखांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यात एकाचा मृत्यू झाला होता. याचा आरोप डेराच्या समर्थकावर होता.
२००७ मध्ये प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही डेराने सिरस्यात नामचर्चा ठेवली होती. यावेळी शीख व डेरा समर्थकांमध्ये दगडफेक झाली होती.
२००७ मध्ये मल्लेवाला गावात नामचर्चेदरम्यान डेराप्रेमीने आपल्या बंदुकीतून गोळी झाडल्याने ३ पोलीसांसह ८ जण जखमी झाले होते.
२००७ मध्ये सीबीआय न्यायालयाने डेरा प्रमुखाला न्यायलयात हजर होण्याचे आदेश दिले होते. तेव्हा सीबीआयच्या विशेष न्यायाधिशांना धमकीचे पत्र आले होते.
२०१० मध्ये डेरा सच्चा सौदाचे माजी व्यवस्थापक फकीर चंद बेपत्ता झाले होते.
२०१२ मध्ये डेरा सच्चा सौदाच्या ४०० साधूंना नपुंसक केल्याचा आरोप आहे.
२०१२ मध्ये सिरस्यात नामचर्चेवरून डेरा समर्थक व शिखांमध्ये मारामारी झाली होती. त्यानंतर डेराप्रेमींनी गुरुद्वाऱ्यावर हमला केल्याचा व त्यांची वाहने पेटवून दिल्याचा आरोप आहे.
२०१६ मध्ये राम रहीम यांची नक्कल केल्यावरून हास्य अभिनेता किकू शारदा ला हरियाणा पोलीसांनी अटक केली होती.
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख म्हणून २३ व्या वर्षात निवड
राजस्थानच्या श्रीगंगा नगरमध्ये जाट शिख कुटूंबात १९६७ मध्ये जन्मलेल्या बाबा राम रहीमला तत्कालीन डेरा स्च्चा सौदा प्रमुख सतनाम सिंह यांनी २३ सप्टेंबर
१९९० मध्ये आपला वारसदार म्हणून घोषित केले. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख म्हणून बाबा राम रहीमने २३ व्या वर्षात कामास सुरुवात केली. डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यानंतर बाबा राम रहीम यांच्या नेतृत्त्वात डेरा सच्चा सौदाची लोकप्रियता झपाट्याने वाढू लागली.
परदेशातही पसरलेले साम्राज्य
जगभरात डेराचे जवळपास ५ कोटी अनुयायी आहेत. ज्यापैकी सुमारे २५ लाख अनुयायी फक्त हरियाणात आहेत. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यूएई या देशांतही डेराचे आश्रम आणि अनुयायी आहेत.
चित्रपटांचा शौकीन बाबा राम रहीम
बाबा राम रहीमला चित्रपटांचाही शौक आहे. तब्बल ५ सिनेमात बाबाने मुख्य अभिनेता म्हणून काम केले आहे. एमएसजीपासून जट्टू इंजिनिअरपर्यंत त्याचे सगळे चित्रपट यशस्वी झाले आहेत.
Comments 1