पश्चिम महाराष्ट्रातील महापूर ओसरल्यानंतर कोल्हापूर सांगलीतलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे. परंतु या पुरामुळे लोकांचं कधीही भरुन न निघणारं नुकसान झालं आहे. लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे इथल्या लोकांना मदतीची गरज आहे. सांगली, कोल्हापूरकरांसाठी मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरातून सामान्यांकडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.
दरम्यान, पूरग्रस्तांना सामान्यांपासून मराठी कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु यात बॉलिवूड कलाकार गायब असल्याची टीका होत आहे. रितेश देशमुख व्यतिरिक्त इतर बॉलिवूड कलाकार मंडळींनी पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष केले आहे. ‘लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है,’ असं म्हणत महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बॉलिवूड कलाकारांवर टीका केली होती.
त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी पुरग्रस्तांसाठी मदत करणार असल्याचे सांगितले होते. आता पूरग्रस्तांसाठी अक्षय कुमार देखील मैदानात उतरला आहे. अक्षय कुमारने एक व्हिडीओ पोस्ट करून कोल्हापूरकरांना धीर दिला आहे.
बघा व्हिडीओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.