बॉलिवूडचा ऍक्शन हिरो अशी ओळख असणारा अक्षय कुमार त्याच्या अभिनयाइतकाच संवेदनशील व्यक्ती म्हणून सर्वांना परिचित आहे. मग कधी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १८० कुटुंबांना केलेली मदत असो, चेन्नईतील पूरग्रस्तांना केलेली मदत असो किंवा शाहिद जवानांच्या कुटुंबियांना केलेली मदत असो;
अक्षय कुमारच्या अभिनयापलीकडच्या माणुसकीचे आपल्याला नेहमीच दर्शन घडले आहे. सेलेब्रिटी म्हणून वावरत असतानाच त्याच्यातला सर्वसामान्य माणूस त्याने जपला आहे. नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगावरून परत एकदा याचा प्रत्यय आला आहे…
दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी अक्षय कुमार मावळमध्ये
पुण्याच्या मावळ तालुक्यातील शिळिंब गावाच्या आसपासच्या निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या हिल्टन हॉटेलमध्ये सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी राजकीय, कला, क्रीडा इत्यादि क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटीज येत असतात. अक्षय कुमारही दिवाळीच्या सुट्ट्या आणि आपल्या आजेसासूबाईंचा ऐंशीवा वाढदिवस साजरा करण्यासाठी पवना डॅम परिसरात आला होता. सुट्टीच्या दरम्यान अक्षय कुमारसोबत एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला, ज्याबद्दल अक्षयने त्याच्या ट्विटरवरुन माहिती दिली आहे.
मुलीची तहान भागवण्यासाठी अक्षय कुमार झोपडीत
३१ ऑक्टोबरला अक्षय आपली मुलगी नितारा हिला घेऊन कारमधून निसर्गाच्या सानिध्यातील ठिकाणी मॉर्निंग वॉकला गेला होता. त्यावेळी त्याच्या मुलीला तहान लागली. मात्र त्याला त्या भागात कुठलेच दुकान सापडले नाही. शेवटी शिंदेवाडी गावामधल्या एका झोपडीसमोर अक्षयने कार थांबवली.
आपल्या मुलीला घेऊन तो झोपडीच्या दाराशी गेला. झोपडीत असणाऱ्या ढमाले वृद्ध दाम्पत्याकडे अक्षय कुमारने प्यायला पाणी मागितले. त्या वृद्ध दाम्पत्याने दाराशी आलेल्या बापलेकीचा पाहुणचार केला, त्यावेळी त्यांना अक्षय कुमार कोण आहे हे माहितदेखील नव्हते.
झोपडीतील दाम्पत्याने केला अक्षय कुमारचा पाहुणचार
ढमाले दाम्पत्याने अक्षय कुमारला झोपडीत बोलावले आणि त्याच्यासाठी बसायला टाकले. त्यांनी अक्षयला पाणी तर दिलेच, सोबत गुळ भाकरीही खायला दिली. तसेच घरात दिवाळीसाठी बनवलेला फराळही दिला. झोपडीतल्या वृद्ध दाम्पत्याच्या आदरातिथ्याने अक्षय कुमार भारावून गेला. त्याने आपली ओळख सांगितली. वृद्ध दाम्पत्याला आनंद झाला.
दरम्यान ही बातमी शिंदेवाडीत पोहोचली आणि बघता बघता मुले गोळा झाली. अक्षय कुमारने ढमाले दाम्पत्य आणि गावातील मुलांसोबत फोटो काढले आणि गावकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांचा निरोप घेतला. त्यानंतर ट्विटरवर अक्षयने ढमाले दाम्पत्याच्या दयाळूपणाचे कौतुक केले आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.