बारामतीत येऊन पवारांवर टीका करणारे विजय शिवतारे 2019 ला आमदार कसे होतात तेच मी बघतो असे जाहीर आवाहन अजित पवार यांनी यांनी दिले होते. सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेमध्ये बोलताना अजित पवार यांनी शिवतारे यांना लक्ष्य करत त्यांच्यावर तोफ डागली. बारामतीत येऊन पवारांनी काय केले असे विचारणार्या विजय शिवतारे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार होऊ देणार नाही असा इशारा अजित पवार यांनी दिला होता.
ावेळी अजित पवार म्हणाले, “विजय शिवतारे 2019 च्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमदार कसे होतं तेच मी बघतो आणि एकदा अजित पवार याने ठरवलं तर अजित पवार कुणाच्या बापाचा ऐकत नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, त्यामुळे आपण कसे आमदार होता तेच मी बघतो”
तर आता या निवडणुकीचे परिणाम समोर आलेले दिसत आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री जलसंपदा-जलसंधारण तथा संसदिय कार्य महाराष्ट्र राज्य मंत्री हे विजय शिवतारे पुरंदर मतदार संघातून पराभूत झाले आहेत. त्यांच्या पराभवानंतर अजित पवार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बघा व्हिडीओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.