लोकसभा निवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावत असतानाच आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेत विजय शिवतारे यांना जाहीर आव्हान दिले होते.
बारामतीत येऊन पवारांवर टीका करणारे विजय शिवतारे 2019 ला आमदार कसे होतात तेच मी बघतो असे जाहीर आवाहन अजित पवार यांनी यांनी दिले होते. सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेमध्ये बोलताना अजित पवार यांनी शिवतारे यांना लक्ष्य करत त्यांच्यावर तोफ डागली. बारामतीत येऊन पवारांनी काय केले असे विचारणार्या विजय शिवतारे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार होऊ देणार नाही असा इशारा अजित पवार यांनी दिला होता.
यावेळी अजित पवार म्हणाले, “विजय शिवतारे 2019 च्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमदार कसे होतं तेच मी बघतो आणि एकदा अजित पवार याने ठरवलं तर अजित पवार कुणाच्या बापाचा ऐकत नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, त्यामुळे आपण कसे आमदार होता तेच मी बघतो”
तर आता या निवडणुकीचे परिणाम समोर आलेले दिसत आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री जलसंपदा-जलसंधारण तथा संसदिय कार्य महाराष्ट्र राज्य मंत्री हे विजय शिवतारे पुरंदर मतदार संघातून लढाई लढत आहे. यांच्या विरोधात कॉंग्रेसचे संजय जगताप हे निवडणूक लढत असून त्यांनी मोठ्या प्रमाणात आघाडी घेतलेली आहे.
यामुळे अजित दादा जे शब्द बोलतात तो खराच ठरवतात हे दिसत आहे. संजय जगताप यांनी मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून हि आघाडी तोडणे आता शक्य वाटत नाही आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.