तुम्हाला २००२ सालच्या देवदास चित्रपटातील ‘डोला रे डोला’ हे गाणे आठवते का ? ज्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित यांनी एकत्रितपणे एका गाण्यावर दमदार नृत्य केले होते. आज देखील बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट नृत्यांमध्ये त्याचा समावेश केला जातो.
मात्र या गाण्याच्या शूटिंग दरम्यान ऐश्वर्या रॉय कोणत्या अडचणींमधून जात होती याची तुम्हाला कल्पना नसेल. आज आम्ही तुम्हाला त्या गाण्याच्या चित्रीकरणावेळी घडलेला किस्सा सांगणार आहोत…
काय होती देवदासची कथा ?
२००२ मध्ये संजय लीला भन्साळी यांनी बंगाली लेखक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित देवदास हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यामध्ये शाहरुख खान (देवदास), माधुरी दीक्षित (चंद्रमुखी) आणि ऐश्वर्या रॉय (पारो) यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटामध्ये देवदास आणि पारो यांची प्रेमकहाणी दाखवली आहे. त्यामध्ये दोघांची ताटातूट होते आणि चंद्रमुखी देवदासच्या आयुष्यात येते. पारोला गमावल्याच्या खुशीत देवदास दारूच्या आहारी जातो. शेवटी ना चंद्रमुखीला देवदास मिळतो ना देवदासला पारो, असा या चित्रपटाचा शेवट दाखवला आहे.
कानातून रक्त निघत असतानाही ऐश्वर्या रॉय नाचत राहिली
देवदास चित्रपटात शाहरुख, ऐश्वर्या आणि माधुरी यांचेएकत्रित “डोला रे डोला ” गाणे आहे. सरोज खान यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. या गाण्यासाठी ऐश्वर्याने केला होता. तसेच दागिनेही भरपूर प्रमाणात घातले होते.
त्यावेळी तिने कानात घातलेल्या रिंग इतक्या जड होत्या की त्यामुळे ऐश्वर्याच्या कानातून रक्त यायला लागले. परंतु गाण्याचे शूटिंग सुरु असल्याने ऐश्वर्याने अडथळा नको म्हणून तसेच नृत्य केले. शूटिंग संपेपर्यंत तिने त्रास सहन केला पण कुणाला याविषयी बोलली नाही. या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
बघा गाणं-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.