खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या मैदानातील ताज्या दमाचा खेळाडू असणारी JIO सारखी कंपनी सध्या आघाडीवर आहे. पण नुकतेच एअरटेल आणि वोडाफोन कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीचा अहवाल प्रसिद्ध झाला, ज्यात या दोन्ही कंपन्यांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अशामध्ये लोक अंदाज लावत आहेत की देशाचे टेलिकॉम सेक्टर मंदीच्या लाटेत बुडणार आहे. याचा अर्थ एअरटेल आणि वोडाफोन भारतातून आपला गाशा गुंडाळतील काय ? यामुळे एअरटेल आणि वोडाफोन धारकांचे काय नुकसान होऊ शकते ?
एअरटेल आणि वोडाफोनला किती नुकसान झाले ?
दुसऱ्या तिमाहीच्या अहवालात एअरटेलने त्यांना २३०४५ कोटींचे तर वोडाफोनने त्यांना ५०९२२ कोटींचे तर नुकसान झाल्याचे सांगितले आहे. दोन्ही कंपन्यांचे मिळून ७४ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. असे सांगितले जाते की हे भारताच्या टेलिकॉम कंपन्यांच्या इतिहासातील सर्वात मोठे नुकसान आहे.
कशामुळे झाले इतके नुकसान ?
देशातील टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी सरकारकडून ध्वनी लहरींचे स्पेक्ट्रम बँड्स विकत घ्यावे लागतात. सरकार या स्पेक्ट्रम बँडसचा लिलाव करते. त्यासाठी मोठी बोली लागते. कंपन्यांकडे एवढा पैसे नसतो. कंपन्या बँकांकडून कर्ज घेऊन पैसे उभे करतात. याच प्रकारे एअरटेल आणि वोडाफोनने स्पेक्ट्रम विकत घेऊन टेलिकॉम सेवा सुरु केल्या. पण मध्येच AGR म्हणजे एड्जस्ट ग्रास रेव्हेन्यू नावाचा पेच उभा राहिला.
AGR म्हणजे टेलिकॉम कंपन्या ज्या प्रक्रियेच्या माध्यमातून सरकारकडून स्पेक्ट्रम विकत घेतात ती प्रक्रिया ! या प्रक्रियेसाठी ३% स्पेटरं फी आणि ८% लायसेन्स फी देण्याच्या विरोधात एअरटेल आणि वोडाफोनसारख्या कंपन्या सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन लढल्या. पण सुप्रीम कोर्टाने त्यांना तीन महिन्यात पैसे देण्याचा आदेश दिला. याचा परिणामस्वरूप कंपन्यांना हे नुकसान झाले आहे.
एअरटेल आणि वोडाफोन भारतातून गाशा गुंडाळून जातील काय ?
आपण असे थेट म्हणू शकत नाही. परंतु परिस्थिती जो निर्देश करत आहे तो चांगला नाही. वोडाफोनच्या सीईओचे दोन दिवसांपूर्वी वक्तव्य आले. ते म्हणतात भारतात खूप जास्त टॅक्स आहे, कायदे आणि नियम साथ देत नाहीत आणि सुप्रिया कोर्टाचा निर्णयही विरोधात गेला.
पण दुसऱ्याच दिवशी सीईओंनी युटर्न घेतला अंडी आपण असे म्हणालोच नव्हतो असा पवित्र घेतला. पण वोडाफोन त्यांच्या बाजार गुंडाळण्याचा मनस्थितीत आहेत.
एकच टेलिकॉम कंपनी वाचेल काय ?
एअरटेल आणि वोडाफोन यांना झालेल्या नुकसानीमुळे भारतात त्या कंपन्या डबघाईला आल्या आहेत. BSNL आणि MTNL दोघांची अवस्था वाईट आहे. अशा परिस्थितीत देखील जिओचे मार्केट मजबूत आहे. AGR च्या नियमानुसार सर्वात कमी फी त्यांना भरावी लागली आहे. त्यांचे मार्केट वाढत असल्याचे अर्थतज्ञांचे मत आहे. लवकरच जिओ 5G मध्ये उतरत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जिओचा दबदबा राहणार आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.