उद्याचा दिवस कुणी बघितला आहे असे आपण बोलता बोलता बोलून जातो. पण वैज्ञानिकांना असे बोलून चालत नाही. वर्तमानातील तंत्रज्ञानाच्या आधारावर याच वैज्ञानिकांनी भविष्याचा पाया घातला आहे.
ब्रिटनमध्ये सुरु असणाऱ्या “सॅमसंग केएक्स ५० : द फ्युचर इन फोकस”च्या अहवालात अविश्वसनीय अशा बाबी सांगण्यात आल्या आहेत. २०६९ पर्यंत आपल्या दैनंदिन जीवनात आश्चर्यकारक अशा तंत्रज्ञानाने व्यापले जाईल असे अंदाज तंत्रज्ञ आणि भविष्यज्ञांनी या अहवालात व्यक्त केले आहेत.
पाण्याच्या आतमध्ये असतील हायवे
भविष्यातील जगात सबसॉनिक ट्यूब ट्रान्सपोर्ट सिस्टम बनविली जाईल. त्यामध्ये पॉड्सच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाता येऊ शकेल. या तंत्रज्ञानाद्वारे एका तासात स्वीडन आणि नॉर्वे येथून ब्रिटनला पोहोचता येऊ शकेल.
आकाशात असतील हॉटेल
भविष्यात अंतराळात सुट्ट्या व्यतीत करण्याचे आपले स्वप्न तंत्रज्ञानाने साकार होईल. भविष्यात आकाशात हॉटेल्स असतील आणि ही हॉटेल्स चंद्र किंवा इतर कुठल्याही ग्रहाभोवती फिरत स्वतःची गुरुत्वशक्ती निर्माण करण्यास सक्षम असतील. अंतराळ पर्यटनाला चालना देण्यासाठी हे प्रभावी सिद्ध होईल.
आकाशात उडणारी वाहने असतील
भविष्यात हाय पॉवर ड्रोन कॉप्टर तंत्रज्ञान जमिनीवरील रहदारीच्या प्रश्नापासून सुटका करेल. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उडणारी वाहने येतील. Dream to Fly चे स्वप्न बघणाऱ्यांना उडणाऱ्या बसेस आणि टॅक्सीमधून आपले स्वप्न पूर्ण करता येईल.
भविष्यातील जगात असतील या आश्चर्यकारक गोष्टी
भविष्यात जमिनीच्या आत बहूमजली इमारती बांधल्या जातील, त्यांच्यावर भूकंपाचा कुठलाही परिणाम होणार नाही. माणसाच्या शरीरात अशा चीप किंवा छोटी उपकरणे बसवली जातील, जी वेळेपूर्वीच शरीरात कुठल्या कमतरतेची किंवा रोगाची चाहूल सांगतील.
तसेच भविष्यात स्वतःची सफाई स्वतःच करणारी घरे निर्माण होतील.गरजू लोकांना अवयव 3-D प्रिंटिंगच्या मदतीने अवयव प्रत्यारोपण करणे सोपे जाईल. भाविषयात हॉवरबोर्डवर 4-D मॅच खेळल्या जातील. माणसाच्या त्वचेच्या आत स्थापित डिव्हाईस श्वासोच्छवास, आपल्या शरीराला आवश्यक जीवनसत्वे यांचे नियंत्रण करतील
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.