स्मिता पाटील ! हिंदी सिनेमासृष्टी जर चेहरा असेल तर स्मिता पाटील त्या चेहऱ्यावरील स्मित आहे असे त्यांच्याबद्दल सांगितले जाते. परंतु दुर्दैवाने त्यांना कमी आयुष्य मिळाले. वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी त्या जग सोडून गेल्या. राज बब्बर यांच्यासोबत त्या लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होत्या. नंतर त्यांनी राज बब्बर यांच्याशी विवाह झाला. त्यांना प्रतीक नावाचा मुलगा झाला. परंतु प्रतिकच्या जन्माच्या अवघ्या काही तासानंतर व्हायरल इंफेक्शनमुळे त्यांना मेंदूचा संसर्ग झाला. आपला मृत्यू समोर दिसत असताना स्मिता पाटलांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मुलाला सोडून कुठेही न जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
वृत्तनिवेदिका ते अभिनेत्री
१९७१ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. १९७५ मध्ये वयाच्या २० व्य वर्षी त्यांना “चरणदास चोर” चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली. त्यातील त्यांचा अभिनय पाहून त्यांना शक्ती, नमक हलाल अशा चित्रपटात संधी मिळाली आणि स्मिता पाटील नावाचा तारा हिंदी सिनेमासृष्टीत चमकायला लागला. त्यांनी जवळपास ७५ चित्रपट केले. विशेष म्हणजे त्यांचे १४ चित्रपट त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित झाले. त्यांना सुवर्णकमळ मिळाले. दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पद्मश्री पुरस्कारानेही त्यांचा सन्मान झाला.
…आणि थरथरत्या हातांनी केला गेला स्मिता पाटलांच्या मृतदेहाला शृंगार !
मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत आणि स्मिता यांच्यात बहीण भावाप्रमाणे नाते होते. १३ डिसेंबर १९८६ रोजी स्मिता पाटील यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय फक्त ३१ वर्ष होते. स्मिता पाटलांना आपल्या मृत्यूची चाहूल आधीच लागली होती. स्मिता पाटलांनी आपली शेवटची इच्छा व्यक्त केली होती, “माझ्या मृत्यूनंतर मला नवरीप्रमाणे सजवावे…” स्मिताच्या मृत्यूनंतर तिची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी दिपकलाच यावे लागले. थरथरत्या हाताने दिपकने स्मिताच्या मृतदेहाचा शृंगार केला. दूरदर्शन याचे शूटिंग केले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.