दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते या अभिनेत्रीचे वडील, देशभक्तीपर सिनेमात झळकली

देशासाठी सीमेवर लढलेल्या आणि शहीद झालेल्या सैनिकाची मुलगी असलेली निमरत कौर या अभिनेत्रीने कमी सिनेमात काम केले असले तरी ते सुपरहिट ठरले. निमरत कौर हि बॉलीवूडमधील एक सर्वश्रुत नाव आहे. निमरत मागील वर्षी आलेल्या एअरलिफ्ट या सिनेमातून अक्षय कुमारसोबत प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

एअरलिफ्ट पूर्वी निमरत कौर अभिनेता इरफान खानसोबत लंचबॉक्स या सिनेमात झळकली होती. लंचबॉक्स मधील तिच्या अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती. प्रेक्षकांना तिचा अभिनय चांगलाच आवडला होता. तिने एक सशक्त महिला म्हणून मोठ्या पडद्यावर आणि छोट्या पडद्यावर भूमिका केल्या आहेत. पण ती तिच्या खर्या आयुष्यात देखील तेवढीच सशक्त आहे.

निमरतने तिच्या खऱ्या आयुष्यात काही अशा घटनांना तोंड दिले आहे जे ऐकूनच आपला थरकाप होईल. तिने एका इंटरव्यूमध्ये याविषयी माहिती दिली होती. निमरतच्या वडिलांची हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी हत्या केली होती.

आर्मीमध्ये होते निमरतचे वडील-

निमरत कौरचे वडील हे आर्मीमध्ये होते. १९९४ मध्ये हि त्यांची ड्युटी काश्मीर मधील वेरिनागमध्ये होती. त्यावेळी तिच्या वडिलांचे वय ४४ होते. तिचे पिता भूपिंदर सिंह यांची त्याच साली हिजबूलच्या दहशतवाद्यांनी हत्या केली. दहशतवाद्यांनी अगोदर भूपिंदर यांचे अपहरण केले आणि त्यांना आपल्या कैदेत ठेवले. त्यानंतर सलग ७ दिवस त्यांच्यावर अत्याचार केले.

दहशतवाद्यांना त्यांच्याकडून काही तरी माहिती हवी होती. पण ती न मिळाल्याने दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. वडिलांच्या निधनानंतर निमरत आपल्या आई आणि आजीसोबत नोएडायेथील घरी राहते. निमरतच्या मते वडिलांच्या निधनानंतर ती अजून सशक्त आणि निडर बनली आहे.

रवी शास्त्रींना करतेय डेट-

मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री निमरत कौर भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना डेट करत आहे. मागील २ वर्षांपासून ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. त्यांची पहिली भेट २०१५ मध्ये एका कारच्या लाँचिंगच्या वेळेस झाली होती. निमरत कौरचे वय रवी शास्त्री यांच्यापेक्षा २० वर्षांनी कमी आहे.

रवी शास्त्री यांचे १९९० मध्ये रितू सिंह यांच्यासोबत लग्न झाले होते. २२ वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला होता. रवी आणि रितू यांची अलका नावाची एक मुलगी सुद्धा आहे. निमरत कौरच्या पूर्वी रवी शास्त्रींनी अभिनेत्री अमृता सिंहला सुद्धा डेट केले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.