“जस्सी जैसी कोई नहीं” या मालिकेमुळे लोकप्रिय बनलेली अभिनेत्री मोना सिंह या वर्षाच्या अखेरीस लग्नाच्या बोहल्यावर चढणार असल्याच्या बातम्या यायला लागल्या आहेत. मोना दिसायला हॉट असल्यामुळे तिची पर्सनल लाईफ देखील तशीच रंगीबेरंगी होती. कधी कारण ओबेरॉयसोबत तर कधी बॉलिवूड कलाकार विद्युत जामवालसोबत मोनाचे नाव चर्चेत असायचे.
आता वयाच्या ३८ व्या वर्षी मोना आपल्या साऊथ मधील प्रियकरासोबत लग्न करणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. साधारण एक वर्षापासून ती रिलेशनशिप मध्ये असून येत्या डिसेंबर महिन्यात तीचे लग्न होऊ शकते. लग्नाच्या बातमीवर मोनाने काहीही माहिती शेअर करण्यास नकार दिला आहे.
मोना सिंगच्या अभिनयाचा प्रवास
नुकतेच “मिशन ओव्हर मार्स” या वेबसीरिजमध्ये मोनाचा अभिनय पाहायला मिळाला. याआधी मागच्या वर्षी तिने “कहने को है हमसफर, ये मेरी फॅमिली” सारख्या वेबसीरिजमध्येही काम केले होते. “राधा की बेटिया कुछ कर दिखायेगी, क्या हुआ तेरा वादा” यासारख्या छोट्या पडद्यावरील मालिकांतून, तर “थ्री इडियट्स” सारख्या मोठ्या पडद्यावरच्या सिनेमातील भूमिकांमुळे मोना गाजली. “झलक दिखला जा” या डान्स रियालिटी शोच्या पहिल्या सिजनची मोना विजेती होती.
जस्सी या पात्रामुळे मोनाला मिळाली ओळख
“जस्सी जैसी कोई नहीं” या छोट्या पडद्यावरच्या हिंदी मालिकेतील चष्मीश लूकमुळे मोना सिंहा लोकप्रियतेचा विषय बनली होती. मालिका सुरु झाली तेव्हा मोना वास्तवात दिसायला कशी आहे याविषयी उत्सुकता राखून ठेवली होती, तिच्याबद्द्दल खुप गुप्तता पाळली गेली होती.
त्यानंतर सुरवंटाचे जसे फुल पाखरु होते, तसा मोनाचा खरा चेहरा पुढे आणला गेला. २००३ मध्ये आलेल्या एकता कपूरच्या या सिरियलने ३ वर्षे चांगलीच लोकप्रियता कमावली होती. आता या जस्सीच्या चाहत्यांना आपल्या लाडक्या जस्सीला नववधुच्या रुपात पाहण्याची उत्सुकता लागुन राहिली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.