आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या देशात बॉलिवूड चित्रपटसृष्टी हे एक वेगळेच जग आहे, एकदा का इथे आले की इथून कुणालाही बाहेर पडू वाटत नाही. बॉलिवूड चित्रपटसृष्टीत येण्यासाठी लोक काहीही करण्यास तयार होतात. आजच्या काळात प्रत्येकाला चित्रपट विश्वाशी संबंधित असलेल्या लोकांविषयी अधिकाधिक माहिती जाणून घ्यायला आवडते. आज आम्ही तुमच्यासाठीसुद्धा अशीच एक बातमी घेऊन आलो आहोत, जी आपल्यालाही विचार करायला भाग पाडेल.
सैन्यातील नोकरी सोडून “ती” बनली बॉलिवूड अभिनेत्री
बॉलिवूड चित्रपट जगतात अशी एक अभिनेत्री देखील आहे जीने सैन्यातील नोकरी सोडून चित्रपट विश्वात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या माहितीसाठी सांगतो, ती अभिनेत्री आजच्या काळातील एक अतिशय यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
त्या अभिनेत्रीला अद्याप मेन रोल मिळाला नसला तरी देव डी, जंजीर, दबंग, साहेब बीबी और गँगस्टर अशा अनेक चित्रपटात काम करुन तिने स्वतःचे नाव कमावले आहे आणि प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती अभिनेत्री आहे माही गिल !
कशी आली सैन्यातील माही बॉलिवूडमध्ये ?
चंदीगड शहरात एका सधन जमीनदार कुटुंबात जन्माला आलेल्या माही गिलला सैन्यात करिअर करायचे होते. त्यासाठी शाळेत असतानाच तिने नॅशनल कॅडेट कोअर (NCC) जॉईन केली होती. तिथूनच तिचा सैन्यात जाण्याचा मार्ग खुला झाला. महिने सैन्यभरतीची परीक्षा दिली आणि ती सैन्यात भरती झाली.
पण माही ट्रेनिंगसाठी चेन्नईला गेल्यानंतर तिच्यासोबत एक प्रसंग घडला. चेन्नई विमानतळावर पॅरासेलिंग ट्रेनिंग दरम्यान माहीचा अपघात झाला आणि ती थोडक्यात बचावली.
या घटनेची माहिती मिळताच माहीचे कुटुंबीय घाबरुन गेले आणि त्यांनी तिला परत बोलावले. शेवटी माहीने सैन्यातील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.