भूमि पेडणेकर आणि तापसी पन्नू यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘सांड की आँख’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. सिनेमात दोन आजींची गोष्ट दाखवण्यात आली आहेत, ज्या उत्कृष्ट नेमबाजी करतात. त्या अशा गावात राहत असतात जिथे आजही महिलांना डोक्यावरून पदर सरकवण्याची परवानगी नाही. पण या सर्व गोष्टींवर मात करून त्या नेमबाजी करतात आणि सांड की आंखवर चोख निशाणा लावतात. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कमाल केली मात्र त्याची क्रेझ अद्याप दिसून येत आहे.
तर आता आपल्या लक्षात आले असेल कि हा फोटो कोणाचा आहे. 18 जुलै 1989 मध्ये भूमीचा जन्मदिवस आहे. भूमी पेडणेकर हिने इंस्टाग्रामवर तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. तिने हा फोटो शेअर करत तिने म्हटलं की, शाळेचा पहिला दिवस. आर्य विद्यामंदिर. आनंदी दिवस. जुन्या आठवणी.
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्व भूमी चित्रपटांसाठी असिस्टंट कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करत होती. भूमीला दम लगाके हईशा या सिनेमासाठी बेस्ट फिमेल डेब्यू कॅटेगरीत फिल्मफेअर अवॉर्डसुध्दा मिळाला आहे. भूमीची आई हरियाणवी तर वडील महाराष्ट्रीयन आहेत.
भूमीच्या आईचे नाव सुमित्रा पेडणेकर असून त्यांनी बहू रानी या हरियाणवी चित्रपटात काम केले आहे. याशिवाय त्या स्क्रिप्ट रायटरसुद्धा आहेत.
सहा वर्षापूर्वी भूमीच्या वडिलांचे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले आहे. पतीच्या निधनानंतर त्यांनी पतीचा बांधकाम व्यवसायात लक्ष घातले. कारण आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल मेहनत करावीच लागेल अशी त्यांची धारणा होती. त्यांनी आपल्या मुलीला काहीही कमी पडू दिले नाही. भूमीची छोटी बहिण समीक्षा वकिलीचे शिक्षण घेत आहे.
भूमि शुभ मंगल सावधान आणि नुकत्याच आलेल्या टॉयलेट एक प्रेम कथा चित्रपटांमध्ये झळकली आहे. या चित्रपटातील भूमिच्या आभिनयाची सर्वांनीच प्रशंसा केली होती. भूमी पेडणेकरने फोर्ब्स इंडियाच्या ’30 अंडर 30′ च्या यादीमध्ये स्थान मिळवले आहे. हे स्थान पडकावणे तिच्या करिअरमधील सर्वात मोठी गोष्टी आहे.
भूमी पेडणेकरचा बाला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती वेगळ्या अंदाजात पहायला मिळणार आहे. यात तिच्यासोबत आयुषमान खुराणा व यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत. बाला चित्रपटाव्यतिरिक्त भूमी पति पत्नी और वो या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन व अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.