३५० रेप सीन करणाऱ्या व्हिलन रणजितने सांगितले कसा असतो रेप सीन

७०-८० च्या दशकातील प्रसिद्ध व्हीलन रणजितच्या नावावर ३५० रेप सीनचा रेकॉर्ड आहे, त्यामुळे त्याला बॉलिवूड चित्रपट “रेप किंग” अशी ओळख मिळाली. पडद्यावर रणजित दिसताच घाबरणाऱ्या मुली त्याचा द्वेष करायच्या. खुद्द रणजितच्या घरी त्याचे काम पाहून रडारड सुरु झाली होती. वाचूया रणजितची कथा आणि त्याने सांगितलेला रेप सीन कसा असतो ते…

रणजित अपघाताने बॉलिवूडमध्ये आला. त्याला एअरफोर्स जॉईन करायची होती. परंतु NDA प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकाच्या मुलीसोबतच त्याचे प्रेमप्रकरण सुरु झाल्याने त्याला काढून टाकण्यात आले. त्यानंतर रणजितची आपल्या आईला खोटे सांगून मित्राच्या मदतीने मुंबईला आला. हळूहळू प्रयत्न केल्यानंतर त्याला चित्रपटात छोटेमोठे रोल मिळाले.

शर्मिली चित्रपटातील रेप सीननंतर रणजित प्रकाशझोतात आला. या चित्रपटाच्या प्रीमियरला रणजितचे कुटुंबीय आणि नातेवाईक आले होते. आईने रेप सीन पाहिल्यानंतर तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिला खरेच वाटले. मुलींची कपडे फाडायला, अब्रू लुटायला लाज वाटत नाही का म्हणत तिने रणजित घराबाहेर जाण्यास सांगितले. शेवटी रणजितने अभिनेत्री राखीला आईशी भेटवून तिची समजूत काढली आणि हे सगळं खोटंखोटं असतं ते पटवून दिले.

त्यानंतर रणजितला धडाधड चित्रपट मिळायला लागले, परंतु बहुतांश त्यांना रेप सीनच द्यावे लागायचे. शेवटी पब्लिकची मागणीच तशी होती. रणजित सांगतो की “डाकू और जवान” चित्रपटात रिना रॉय सोबतचा रेप सीन सर्वात अवघड होता. त्या सीनमध्ये रीनाच्या चारी बाजूंनी तेलाचे दिवे लावले होते, थोडासाजरी धक्का लागला असता तर गरम तेल रीनाच्या अंगावर पडले असते.

रणजित असा करायचा रेप सीन

रणजित सांगतो की “प्रेम प्रतिज्ञा” चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत त्याचा रेप सीन होता. मधुर खूप घाबरलेली होती. ते पाहून रणजित तिच्याजवळ गेले आणि तिच्या कानात सांगितले, “असे केस ओढ, तसा धक्का मार…” थोडक्यात रेप करणारा व्हिलनच हिरोइन्सला मार्गदर्शन करायचा.

रणजितच्या अशा सीनमुळे त्याचा द्वेष करणाऱ्या जशा महिला होत्या, तशाच रणजितसोबत एक रात्र घालवण्याची मागणी करणाऱ्याची महिला असायच्या. रणजितला अश्लील मेसेज करायच्या, परंतु रणजित आपल्या पत्नीसोबत प्रामाणिक राहिला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.