जितेंद्र ! आपल्या अभिनय आणि हटके डान्स स्टाईलने बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळं स्थान निर्माण करणाऱ्यांमध्ये अभिनेता जितेंद्रचे नाव घेतलेजाते. धर्मेंद्रच्या आधी हेमा मालिनीसोबत जितेंद्रचे नाव बराच काळ चर्चेत होते. दोघांच्या लग्नापर्यंत विषय गेला होता, पण ऐनवेळी सर्व बिनसलं आणि त्यांचे लग्न मोडले. त्यानंतर जितेंद्रने शोभा यांच्याशी लग्न केले. त्यांची दोन्ही मुले एकता कपूर आणि तुषार कपूर यांनी टेलिव्हिजन आणि सिनेमासृष्टीत आपापली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
महमूद ! बॉलिवूडचा विनोदाचा बादशाह ! कधीकाळी ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या महमूदला मीनाकुमारीने टेबल टेनिस शिकवण्यासाठी नोकरीस ठेवले होते. मीनाकुमारीची भिन्न मधू हिच्याशी महमूदचे लग्न झाले. त्यानंतर महमूद चित्रपटसृष्टीत आला. कॉमेडी कलाकार म्हणून लोकांनी त्याला डोक्यावर घेतले. त्याकाळात मुख्य हिरोपेक्षा महमूद यांचे मानधन जास्त असायचे. जितेंद्र सोबतच्या हमजोली चित्रपटात जितेंद्रला २ लाख तर महमूदला ८ लाख रुपये मानधन दिले होते. याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक मजेशीर किस्सा घडला होता.
कॉमेडी सीनसाठी जितेंद्रला हसवण्यासाठी मेहमूदने पँटच उतरवली आणि…
हमजोली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जितेंद्र आणि अरुणा इराणी यांचा एक कॉमेडी सीन होता. त्यामध्ये जितेंद्रला मोठमोठ्याने हसायचे होते. परंतु जितेंद्रला काही केल्या हसूच येत नव्हते. त्यानंतर महमूद जितेंद्र जवळ गेले आणि त्यांनी जितेंद्रच्या कानात सांगितले, सिन करताना दरवाजाच्या दिशेने एकदा बघ. जितेंद्रला काही समजले नाही. सीन सुरु झाला. जितेंद्रने दरवाजाकडे पहिले, दरवाजात महमूद पँट उतरवून उभा होता. ते पाहून जितेंद्रला मोठमोठ्याने हसू आले आणि त्याचा सिन पूर्ण झाला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.