गेल्या चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ मराठी चित्रपट सृष्टीत कधी प्रेक्षकांच्या ओठावर हसू तर कधी त्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा अभिनय साकारणारे अशोक सराफ आता ७१ वर्षांचे झाले आहेत. आतापर्यंत २५० हुन अधिक चित्रपटांमधून नायक, खलनायक आणि विनोदी कलाकार अशा विविधांगी भूमिका अशोक सराफांनी साकारल्या आहेत. केवळ चित्रपटच नाहीत, तर मालिकांमधूनही त्यांनी काम केले आहे. जवळपास प्रत्येक मराठी प्रेक्षकांना अशोक सराफ हे नाव माहित आहे. आज त्याच अशोक सराफांच्या आयुष्यातील तीन अत्यंत दुर्मिळ प्रसंग आम्ही आपणाला सांगणार आहोत.
१) तोंड लपवुन रेल्वे प्रवास :
विनोदी चित्रपटांचे बादशाह दादा कोंडकेंच्या पांडु हवालदार चित्रपटात अशोक सराफांनाही काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतरच अशोक सराफांना मराठी अभिनेते म्हणून लोक ओळखायला लागले. अशोक सराफांना इतर चित्रपटाच्या ऑफर यायला लागल्या. अशाच एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी अशोक सराफ महालक्ष्मी एक्सप्रेसच्या जनरल डब्यातुन जात असताना सोबतच्या प्रवाशांमध्ये दोन पोलीस होते. त्यांनी अशोक सराफांना ओळखले. आपसात चर्चा करताना त्यांनी कलाकारांपेक्षा पोलिसांचे दिवस चांगले आहेत असे म्हणत टोमणा मारला. लोकांमध्ये हशा पिकला. त्यामुळे अशोक सराफांना वाईट वाटले. त्यांनतर संपूर्ण प्रवासादरम्यान अशोक सराफांनी त्यांच्यापासून तोंड लपवून प्रवास केला.
२) अशोक सराफांचा झाला होता भयंकर अपघात :
साधारणपणे १९९२-९३ च्या आसपासचा हा प्रसंग आहे. अशोक सराफ गाडीतून प्रवास करत असताना त्यांच्या गाडीचा भयंकर अपघात झाला. त्या अपघातात अशोक सराफांच्या मानेला जबर मार लागला. त्यामुळे जवळपास ६ महिने अशोक सराफांना विश्रांती घ्यावी लागली. त्यांना शुटिंगपासून दुर राहावे लागले. सहा महिन्यानंतर “पोरीचा मामला” चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी परत एकदा मराठी चित्रपट सृष्टीत पुनरागमन केले.
३) लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफांची जोडी :
मराठी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता की अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीचा चित्रपट म्हणलं की हाऊसफुल व्हायचा. हे दोन्ही अभिनेते एकमेकांचे चांगले मित्र होते. कधीकाळी मुंबईच्या गिरगावच्या एका टोकाच्या कुंभारवाडा भागात राहणारे लक्ष्मीकांत बेर्डे आणि चिखलवाडी भगत राहणारे अशोक सराफ चित्रपटसृष्टीत रुळल्यानंतर अंधेरीच्या पश्चिम भागातील आंबोली येथील एकाच बिल्डिंगमध्ये राहायला आले.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.