ओ हो हो स्कूल टाइम, ऍक्शन का स्कूल टाइम…क्लासवर्क, होमवर्क, पनिशमेंट लेक्चर…गुड…गुड मॉर्निंग टीचर” लहानपणापासुन आपण सर्वजण ज्या टीव्ही जाहिराती बघत मोठे झालो आहोत,
त्यापैकी एक जाहिरात म्हणजे “ऍक्शन का स्कुल टाइम” ही एक जाहिरात ! ९० च्या दशकातील प्रत्येक मुलाने ही जाहिरात गुणगुणली असेल.काळ पालटला आणि आपण पुढे निघून आलो.
पण अनेक वर्षांनंतर त्या जाहिरातीतील मुलगा आता खूप मोठा माणूस बनल्याची बातमी आली आहे. जाणून घेऊया त्या कुरळ्या केसाच्या मुलाविषयी…
कोण आहे तो मुलगा ?
ऍक्शनच्या जाहिरातीत दिसणारा कुरळ्या केसांचा मुलगा आपल्याला त्याचे चमकणारे शूज दाखवायचा आणि इकडे आपण आईवडिलांकडे आपल्याला हेच शूज पाहिजेत म्हणून हट्ट करायचो. जाहिरातीतील त्या कुरळ्या केसांच्या मुलाचे नाव तेजन दिवानजी असे आहे.
तेजनने त्याकाळात ना केवळ ऍक्शनच्या स्कुल टाइम शूजच्या जाहिरातीत काम केले;
त्याने मॅगी,बँड-एड बँडेज अशा जाहिरातीतही काम केले होते. एवढेच नाही “पहला नशा” च्या रिमिक्स व्हर्जन मध्येही तो दिसला होता.
डॉक्टर बनून तेजानं करतो कॅन्सरचा इलाज लहानपणी जाहिरातीत पाहिलेला तेजन आता डॉ.तेजन दिवानजी बनला आहे.
तो MD बनला आहे. तेजन रेडिएशन ऑन्कोलॉजी तज्ञ असून तो कॅन्सरचा इलाज करतो.
त्याने मध्ये नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटी मधून बायोमेडिकल इंजिनियरिंग पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्याने युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड स्कुल मधून डॉक्टर ऑफ मेडिसिन पदवी घेतली आहे.
त्यांनतर त्याने बाल्टिमोर (मेरीलँड) च्या मेडस्टर युनियन मेमोरियल हॉस्पिटलमधून इंटर्नशिप केली. तेजन सध्या तिथेच सिल्व्हेस्टर कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटरमध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजीचे असिस्टेंट प्रोफेसर म्हणून काम करतो.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.