हमारी भूल कमल का फुल लिहल्यास का झाले फेसबुक खाते बॅन..

लोकसत्ता मध्ये काही दिवसा अगोदर एक बातमी देण्यात आली ज्याच्या शिर्षकावरून त्यांनी सर्वाना सल्ला दिलाय कि हमारी भूल कमल का फुल असे वाक्य लिहू नका… बातमीची लिंक इथे देत आहो व खाली त्या बातमीचा फोटो…

सदर बातमी अशी होती कि “मोहम्मद अनस नावच्या युजरचं अकाऊंट फेसबुककडून ३० दिवस बंद करण्यात आलं आहे. त्याने ‘कमल का फूल हमारी भूल’ असं स्टेटस फेसबुकवर अपलोड केलं होतं. पण त्यानंतर काहीच वेळात त्याचं अकाऊंट फेसबुककडून बंद करण्यात आलं.”

प्रसार माध्यमे हे आपल्या पर्यंत घटनेमागील सत्य पोहचवायला असतात परंतु इथे झालच वेगळ आहे. तर बघूया एकंदर काय होते प्रकरण मोहम्मद अनस या युवकाने एका मेडिकलचे बिल फेसबुकवर पोस्ट केले जे सध्याही मोठ्या प्रमाणात वायरल झालेले आहे. त्या बिलाचा फोटो खालिल प्रमाणे आहे.

मोहम्मद अनस यांची पोस्ट

या पोस्टमध्ये हा युवक लिहतो कि ” कमल का फुल हमारी भूल| व्यापारी यह कैश मेमोपर लिखकर प्रिंट करवा कर जनता को बता रहे है भाजपा को वोट देकर हमने गळती कर दि है” या नंतर सदर व्यक्तीचे अकाउंट फेसबुक मार्फत बॅन करण्यात आले.

परंतु या घटनेमागील दुसरे एक तथ्य आहे. जे तथ्य मिडीयानी लोकासमोर आणले नाही किंवा त्यांना याबाबत माहिती नसावी. मोहम्मद अनस हा फेसबुक मार्फत चौथ्या वेळेस बॅन झाला आहे असे त्याने हिंदुस्तान टाईम्स सोबत बोलताना सांगितले आहे.

फेसबुकच्या नियमानुसार कुठल्याही व्यक्तीचे अकाऊन्ट रिपोर्ट झाल्यास त्या व्यक्तीस पहिल्या वेळेस ३ दिवसाकरिता बॅन व परत हा प्रकार घडला तर बॅनचा कालावधी ७,१५,३० दिवस असा वाढविण्यात येतो.

आता प्रश्न राहतो कि हाच व्यक्ती बॅन का होत असावा, सर्वाना माहिती आहे कि पक्षाच्या आयटी सेल याच कामा करिता प्रसिध्द आहे. कधी फेक फोटो बनविणे तर कधी खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे. त्याचे अकाऊन्ट हे काही संघटीत लोकांनी मुद्दाम रिपोर्ट केलेले आहे. ज्यामुळे तो ३० दिवसाकरिता बॅन झालेला आहे. या अगोदरहि त्याच्या सोबत हा प्रकार घडलेला आहे म्हणून त्याचा बॅनचा कालावधी जास्त आहे.

आज मोहमद अनसचा आवाज त्याचे अकाऊन्ट रिपोर्टनि बॅन करून दाबण्यात आला. पुढे तुमच्या सोबत हि हा प्रकार घडू शकतो परंतु फेसबुकवर तुम्ही या विरुध्द अपील करू शकता. तुमची चूक नसेल तर एक contact form भरून दिल्यास परत आपले account सुरु करता येईल.

https://www.facebook.com/help/contact/260749603972907

या लिंकची तुम्ही मदत घेऊ शकता…
त्यामुळे बिनधास्त फेसबुकच्या चौकटीत राहून लिहा. आणि प्रसिद्धी माध्यमांनी सुध्दा अश्या गोष्टी टाकून सामान्य माणसाच्या मनात भीतीचे वातावरण तयार करू नये…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.