आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अभिजित बिचुकले यांना कित मत मिळाले माहिती आहे का ?

स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकले यानं आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यानं कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे.

बिग बॉस मराठी सीजन २’ मुळे अभिजित बिचुकले हे नाव अधिक चर्चेत आले आणि याच गोष्टीचा फायदा घेत अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदार संघातून थेट आदित्य ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटले होते.

अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाले होते. साताऱ्याचे असलेल्या बिचुकले यांनी पोलिसांनी बिग बॉसच्या घरामधूनच अटक केली होती. महिनाभर कोठडीत राहिल्यानंतर अभिजित यांची पुन्हा बिग बॉस हाऊसमध्ये एन्ट्री झाली होती.

पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले बिचुकले सातारा नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते. पण गेली काही वर्षं ते राजकारणात नशीब आजमावताना दिसत आहेत. २००४पासून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत आतापर्यंत नगरपालिका ते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांनी नशीब आजमावलं आहे. सातारा शहरात गुरुवार पेठ परिसरात पत्र्याच्या छोट्याशा घरात बिचुकले राहतात.

अभिजित बिचुकले यांनी आजपर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मात्र एकाही निवडणुकीत त्यांना यश मिळालेलं नाही. पण निवडणुकीला उभं राहणं आणि प्रचाराच्या पद्धतीने ते कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.

या हि निवडणुकीत आदित्य विरोधात अभिजित बिचुकले यांची जादू काही चालली नाही आणि त्यांना आदित्य ठाकरे विरोधात वरळी मतदार संघातून अपक्ष अभिजित बिचुकले यांना ७७६ एवढे मते मिळालेली आहे.

मात्र, तरीही हार न मानता त्याचे प्रयत्न सुरूच आहेत. ‘२०१९ चा मुख्यमंत्री मीच ठरवणार’, असं बेधडक वक्तव्यही त्यानं केलं होतं.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.