हिंदी सिनेमाचे जगात कुठेही नाव निघाले तर प्रत्येक जण या तीन जनाचे नाव घेणार म्हणजे घेणारच हे नक्की आहे. आमीर खान, शाहरुख खान आणि सलमान खान हे तीन खान हिंदी चित्रपट सृष्टी अनेक वर्षापासून गाजवत आहे. परंतु तिघेही एका सिनेमात सोबत कधी दिसले नाही.
या तिघांनी एकमेका सोबत काम केलेले आहे परंतु हे तिघे सोबत कधी एका चित्रपटात दिसले नाही आहे. अंदाज अपना अपना मध्ये सलमान आणि आमीर ने चांगलाच गाजवला होता. आमीर आणि शाहरुख आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पहला नशा’ या चित्रपटात सोबत दिसले होते.
‘करण-अर्जुन’, ‘हम तुम्हारे हैं सनम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘ओम शांति ओम’, ‘ट्यूबलाइट’ आणि ‘झीरो’ या चित्रपटात तुम्हाला शाहरुख आणि सलमान सोबत होते. हे नेहमी एकमेकांना मदत करतात. काही वर्षा अगोदर यांच्या भांडणाच्या चर्चा देखील रंगल्या होत्या.
‘आप की अदालत’ या कार्यक्रमाचे २१ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रजत शर्मा या तिघांना एकाच शो मध्ये घेऊन आले होते. परंतु या तिघांच्या चाहत्या साठी आता एक खुशखबर आहे ती म्हणजे, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा सिनेमा ‘लाल सिंह चड्ढा’ पुढच्या वर्षी रुपेरी पडद्यावर येणार आहे.
आमिरने या सिनेमात शाहरुख खानसाठी एक स्पेशल रोल ठेवण्यात आला आहे. ही कुठला कॅमियो रोल नसून एक महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे, जी सिनेमासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. शाहरुख व्यतिरिक्त आमिर सलमान खानलाही या सिनेमात घेण्याच्या विचारात आहे. आमिर खानला त्याच्या या सिनेमात तिन्ही खान एकत्र दाखवण्याची इच्छा आहे.
शाहरुखने त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमातील भूमिकेबाबत सांगितलं आहे, मात्र, अद्याप सलमान खानने या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्यासाठी होकार दिलेला नाही. या सिनेमाची काहाणी अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे.
तर ‘सीक्रेट सुपरस्टार’सिनेमाचे दिग्दर्शक अद्वैत चंदन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. वायाकॉम 18 मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून या सिनेमाची निर्मिती केली जात आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा 2020 मध्ये ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.