आमीर खान हे हिंदी चित्रपटातील मोठे नाव परंतु या नावासोबत एक नाव अजूनही जुळले फैझल खान हे आहे. फैजलचा मेला चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला होता परंतु तो त्या नंतर कधीच दिसला नाही. आणि त्याचे चित्रपट देखील चालले नाही. त्यानंतर त्याच्या सोबत काय झाले हे अनेकांना माहिती नाही.
मेला नंतर काबू आणि बस्ती हे दोन छोटे चित्रपट थोडेफार चालले होते परंतु त्या चित्रपटाना प्रसिद्धी मिळाली नाही. त्या नंतर फैजल याला एक मानसिक रोग झाला त्याला Schizophrenia असे म्हणतात. यामध्ये व्यक्तीचा स्वभाव प्रत्येक मिनटाला बदलत असतो. त्याला कधीही राग तर कधी दुख असे वेगवेगळे मूड त्याचे बदलत असतात. हा रोज बरा होऊ शकतो फक्त त्याला योग्य उपचार मिळाला पाहिजे.
फैजल ने मेला चित्रपटा अगोदर कयामत से कयामत तक, जो जिता वो सिकंदर या चित्रपटात मन्सूर खान यांच्या सोबत सहायक निर्मात्याचे काम केले आहे. तसेच त्याचे वडील ताहीर हुसेन यांच्या सोबत देखील तुम मेरे हो या चित्रपटात सहायक निर्मात्याचे काम केले आहे.
२००८ मध्ये फैजल याने एका मुलाखतीत आपल्या भावावर अनेक आरोप केले होते. मेला २ हा चित्रपट त्याच्या मुळे होऊ शकला नाही त्याच्यामुळे माझे करीयर खराब झाले असा तो बोलला होता. परंतु या काळात त्याला मानसिक आजार झाला होता हे तथ्य नंतर समोर आले होते.
सध्या ५३ वर्ष वय झालेल्या फैजल खान याला दिग्दर्शक व्हायचे आहे. तो त्यासाठी आता काम करत आहे. त्याला स्वतःच्या आयुष्यावर देखील एक चित्रपट बनवायचा आहे असे त्याचे म्हणणे आहे. आमीर आणि त्याच्या भावाचे संबंध चांगले नाही आहे कारण त्याने आरोप केले होते कि आमीर ने त्याला एका खोलीत कोंडून ठेवून पागल केले होते.
न्यायालयाने फैजल याच्या पालन पोषणाची जवाबदारी वडिलाकडे दिली होती परंतु त्यांना त्याचा सांभाळ करणे शक्य नव्हते त्यामुळे अमीर खान कडे त्याची जवाबदारी देण्यात आली परतू तो सध्या मुंबईला भाड्याने एकटा राहतो.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.