६० वर्ष झाले कि देव धर्म करावा, आराम करावा, असे अनेक लोकांचे स्वप्न असते. परंतु काही लोक असे असतात त्यांना आयुष्यात आराम करायला आवडत नाही असेच काही आहे तामिळनाडू येथील वादीवेलमपालयम येथील कमलाथल या आजी बाई सोबत आहे सध्या त्यांचे वय ८० वर्ष आहे. त्यांनी आजही या वयात आपले काम थांबवले नाही आहे आणि संपूर्ण ताकदीने आजही त्याच उस्ताहात आजीबाई काम करत आहे.
वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी या कामाची सुरवात केली होती. मागील ३० वर्षापासून आजीबाई हे काम आहे. तरून युवकांना हे त्यांचे काम अतिशय प्रेरणादायी आहे. सकाळी ;लवकर उठून पूजा पाठ केल्यानंतर आजीबाई कामाला सुरवात करतात. या कामासाठी कमलाथल कोणाची मदत घेत नाही स्वतः संपूर्ण काम त्या पूर्ण करतात.
रोज सकाळी शेतात जाऊन अगदी ताजा भाजीपाला घेऊन येणे यासाठी त्यांच्या सोबत आजीबाईचा मुलगा असतो. हा भाजीपाला स्वतः कापून सांबर बनवितात. चटणी आज देखील त्या दगडाच्या पाट्यावर बनवितात. आणि या नतंर इडली बनवली जाते.
कमलाथल आजीच्या हाताने बनविलेली इडली एवढी प्रसिद्ध आहे कि दुरून दुरून लोक इथे इडली सांभारची चव घेण्यासाठी येतात. कमलाथल आजीच्या घरासमोर रोज लांबच्या लांब लोकांच्या लाईन असतात. हे दृश्य त्यांच्या साठी आता सामान्य झाले आहे.
कमलाथल आजी इडली आणि सांभार फक्त १ रुपयाला विकते त्या सोबत स्वतःच्या हाताने बनविलेली चटणी देखील देतात. अनेकांचे म्हणणे आहे कि कमलाथल आजीने बनविलेल्या इडली सारखी इडली कुठेच मिळत नाही.
कमलाथल आजीला सहा रुपये किलोने तांदूळ मिळतो. त्यामुळे त्यांना हे बनवायला परवडते असे त्यांचे म्हणणे आहे. एकूण ४ तास रोज त्यांना इडली सांभार बनवायला लागतो. इडली आणि सांभार बनवायला तांदूळ आणि उडीद डाळ रात्रीच बारीक करून ठेवल्या जातात. कमलाथल आजीच्या म्हणण्या नुसार रोज ती १ हजार इडली बनविते.
दुपार नंतर कमलाथल आजी दुसऱ्या दिवसासाठी तयारी करतात. कमलाथल आजीच्या म्हणण्या नुसार गरीब माणूस १५ ते २० रुपयाचा नाश्ता करू शकत नाही. यासाठी त्यांनी कमी भावात इडली विकण्यास सुरवात केली. एक प्रकारे हि समाजसेवाच आहे.
१ रुपयात १००० इडली विकून तिला २०० रुपये नफा होतो. यासोबत ती उझुंतू बोंडा २.५० रुपयाला विकते. सुरवातीला कमलाथल आजी ५० पैश्याने इडली विकत होती. तिच्या या धंद्यामुळे अनेक गरीबाचे पोट भरत आहे हे नक्की आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाल info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.