जगभरातील सर्वाधिक क्रिकेट चाहते भारतात आहेत. क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नाही, पण भारताचा आत्मा या खेळात आहे. भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो आणि लोक क्रिकेटला एकप्रकारे सण म्हणून साजरा करतात. एवढंच नाही तर तर भारताने क्रिकेटलाही देव (सचिन तेंडुलकर) दिला आहे. क्रिकेटने क्रिकेटपटूंचे आयुष्यच बदलून टाकलं आहे. अशी अनेक उदाहरणे तुम्हाला सापडतील. आज आम्ही तुम्हाला अशा 7 भारतीय क्रिकेटर्सबद्दल सांगत आहोत जे आधी खूप गरीब होते पण नंतर क्रिकेटने त्यांचे आयुष्य बदलून टाकले.
जसप्रीत बुमराह…
जसप्रीत जसबीरसिंह बुमराह (जन्म ६ डिसेंबर १९९३ अहमदाबाद, गुजरात, भारत) हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे जो क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाकडून खेळतो. तो सातत्याने 140-145 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो, ज्यामुळे तो भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज बनला आहे. तो आज भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वाचा भाग आहे आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करतोय. एकेकाळी बुमराह खूप गरीब होता. त्याच्याकडे शूज आणि कपडे घेण्यासाठीही पैसे नव्हते पण आज तो कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. तो सध्या ऐषोआरामाचे जीवन जगतो. बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. अलीकडेच त्याला मुंबई इंडियन्सने 12 कोटी रुपयांना रिटेन केले आहे.
मोहम्मद सिराज…
मोहम्मद सिराज काही वर्षांपूर्वीपर्यंत खूप सामान्य जीवन जगत होता. आयपीएलने त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. हैदराबादचे राहणारे मोहम्मद सिराजचे वडील ऑटो रिक्षा चालवायचे. गेल्या एक-दोन वर्षांत सिराजच्या खेळात कमालीचे बदल झाले आहेत, त्यामुळे तो भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक म्हणून समोर आला आहे. एकेकाळी आर्थिक विवंचनेशी झगडणारा मोहम्मद सिराज हा आज भारतीय क्रिकेटचे उदयोन्मुख नाव आहे.
हार्दिक पांड्या और क्रुनाल पांड्या…
हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याची कहाणी सर्वांनाच ठाऊक आहे. पंड्या ब्रदर्सने क्रिकेट जगतात चांगले नाव कमावले आहे. दोन्ही भाऊ आज अतिशय शाही जीवन जगत आहेत आणि ते क्रिकेटमधून कोट्यवधी रुपये कमावता. त्यांच्या दिवंगत वडिलांकडे दोन्ही भावांच्या क्रिकेट किटसाठी कधीही पैसे नसायचे. यावरून त्यांच्या पूर्वीच्या परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.
रवींद्र जडेजा…
‘सर रवींद्र जडेजा’ या नावाने प्रसिद्ध असलेला रवींद्र जडेजा याचा जन्म 6 डिसेंबर 1988 रोजी गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय घरात झाला. त्याच्या वडिलांचे नाव अनिरुद्धसिंह जडेजा आणि आईचे नाव लता जडेजा आहे. त्याचे वडील अनिरुद्धसिंह जडेजा लष्करात होते. ते सैन्यात जखमी झाले होते, त्यामुळे त्याना लष्कराची नोकरी सोडावी लागली होती. जडेजा खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखला जातो. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजीसोबतच तो आपल्या अतुलनीय क्षेत्ररक्षणानेही खूप चर्चेत असतो. सुखसोयींच्या बाबतीत जडेजा एखाद्या राजा महाराजांपेक्षा कमी नाही. जडेजाने लहानपणी गरिबी पाहिली असली तरी क्रिकेटमुळे त्याचे आयुष्य बदलले. आज त्याच्याकडे ऐशोआरामासाठी सर्व काही उपलब्ध आहे.
टी नटराजन…
नटराजन सुरुवातीला टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचा. पण वयाच्या 20 व्या वर्षी त्याने हा खेळ खूप गांभीर्याने घेतला. गुरू जयप्रकाश यांच्यासोबत त्याने खूप मेहनत घेतली. त्याच्या गोलंदाजीवर खूप मेहनत घेतली. नटराजनच्या गोलंदाजीची खास गोष्ट म्हणजे तो एका षटकात सहा यॉर्कर चेंडू टाकू शकतो. त्याने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याचवेळी नटराजन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो. नटराजनच्या आईने रस्त्याच्या कडेला अंडी विकून आपल्या पाच मुलांचे पालनपोषण केल्याचे सांगितले जाते. तथापि आज टी नटराजन चांगले जीवन जगत आहे. टी नटराजनने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यानंतर त्याला भारतीय क्रिकेट संघातही स्थान मिळाले.
महेंद्र सिंह धोनी…
महेंद्रसिंग धोनी किंवा मानद लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी), झारखंडच्या रांची येथे जन्मला. पद्मभूषण, पद्मश्री आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारप्राप्त क्रिकेटपटू म्हणून धोनी परिचित आहे. तो भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि भारताचा सर्वात यशस्वी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून ओळखला जातो.
महेंद्रसिंग धोनीची गणना भारतातील तसेच जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. धोनीची गणना आज जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. पण आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात महेंद्रसिंग धोनी रेल्वेत नोकरी करत असे. तरीही त्याची क्रिकेटची आवड कमी झाली नाही. रेल्वेची नोकरी सोडून तो जगातील महान क्रिकेटपटू बनण्यात यशस्वी ठरला.