घरात ९ लोक मिळाले ५ मत वायरल झालेल्या व्हिडीओचे सत्य वाचा…

निवडणुकीच्या काळात अनेक व्हिडीओ वायरल झाले आणि आपण ते पुढे तथ्य जाणल्या शिवाय फोरवर्ड करतो असच काही नीतू सुतरनवाला यांच्या विडीओ सोबत झालेले आहे. पंजाब जालंधर मधून ते अपक्ष उमेदवार होते आणि त्यांना ५ मत पडले म्हणून त्यांचे अनेक पोस्ट आणि व्हिडीओ वायरल झालेले आहे कारण त्यांच्या कुटुंबात ९ लोक आणि मिळाले ५ मतदान

इंस्ताग्रम, फेसबुक आणि व्हात्त्सअपवर अनेकांनी हा व्हिडीओ तुम्हाला पाठविला असेल ज्यामध्ये तो म्हणतो ” माझ्या घरात ९ मतदार आहे आणि मी प्रत्येक भागात गाडीने फिरलो, दुकान बंद ठेवले मताकरिता लोकांना विनंती केली. काम बंद केले परंतु लोकांनी मला मतदान नाही केले. या पुढे मी आता निवडणूक लढणार नाही” असा तो व्हिडीओ मध्ये बोलत आहे.

या गोष्टीची शहनिशा करण्याकरिता आम्ही इलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईटवर गेलो असता तिथे आम्हाला वेगळा प्रकार बघायला मिळाला. आमच्या मते नितूने आपली हार मान्य करत दुपारीच कॅमेरा आणि पत्रकारांना आपली प्रतिक्रिया दिली. त्याला या गोष्टीचे दुख वाटत होते कि आपल्या कुटुंबाने आपल्याला मतदान केले नाही.

परंतु निवडणूक आयोगाच्या वेबसाईटचा डाटा खालील प्रमाणे आहे.

त्याला या निवडणुकीत ५ मत नाहीतर तब्बल ८५६ मते मिळाली आहे. या गोष्टीची पडताळणी अनेक मोठ्या वृत्तपत्रांनी देखील केलेली आहे. वेबसाईट वर स्पष्ट आहे कि त्याला ८५६ मतदान मिळालेले आहे. नीतू शटरनवाला याची शटर बनवायची कंपनी आहे आणि काही दिवसा खाली खोट्या बॉबला जोडलेला मोबाईल त्याने उचलला होता.

या प्रकरणामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली होती. आणि याच गोष्टी मुळे त्याने लोकसभा लढवायचा निर्णय घेतला होता. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.