चष्मा घालवण्यासाठी करा ५ हे घरघुती उपाय

आपले डोळे हे जन्माला आल्यानंतर मिळालेला सर्वात अनमोल असा अंग आहे, ज्याशिवाय आपले आयुष्य पूर्ण होत नाही. परंतु आपल्या सर्वांची दृष्टी एकसारखी नसते. त्यासाठी चष्मा वापरुन दृष्टिदोष दूर करता येतात. परंतु अनेकांना चष्मा वापरण्यात अस्वस्थपणा जाणवतो. चष्मा घालवण्यासाठी अनेक पुस्तकांतून किंवा डॉक्टरांकडून माहिती मिळते. मुळात चष्मा लागण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या डोळ्यांची क्षमता कमी होणे.

यामागची कारणे अनेक असू शकतात. परंतु चष्मा टाळण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय आहेत. यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे आहार आणि डोळ्यांसाठी काही व्यायाम समाविष्ट आहेत. या लेखात आपण चष्मापासून मुक्त होण्याचे काही आहार पाहणार आहोत…

१) गाजर : गाजरामध्ये बीटा कॅरेटिन नावाचे अँटीऑक्सिडेंट तसेच अ जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते. अ जीवनसत्व डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असते. नियमितपणे गाजर खाणाऱ्यांना रातांधळेपणा हा रोग होत नाही. कच्च्या गाजराचे सेवन चष्मा घालवण्यासाठी आवश्यक आहे.

२) पालक : पालकामध्ये अ, ब, क, ई यासारखी जीवनसत्व, लोह, झिंक सारखी प्रतिकारक पोषकतत्वे आणि ल्युटीन आणि झिएक्सांथीन यासारखी प्रतिकारक खनिजे असतात. पालकांच्या नियमित सेवनाने वयानुसार कमी होणारी दृष्टी आणि मोतीबिंदूचा दोष दूर करण्यास मदत होते. तसेच आपला डोळ्यांच्या बाहुलीचा पडदा निरोगी राहतो.

३) दाणे : सुक्या मेव्यामध्ये चरबी आणि ई जीवनसत्व आढळते, जे डोळ्यांचा दाह कमी करण्यास मदत करते. ई जीवनसत्वामुळे मोतीबिंदूच्या त्रास दूर करता येतो. चष्मा घालवण्यासाठी सुकामेवा खाणे फायदेशीर असते.

४) शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये अ, ई, क जीवनसत्व आणि झॅक्सॅथिन, ल्युटीन सारख्या फायटोन्यूट्रिएंटचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे वयानुसार कमी होणारी दृष्टीचा त्रास कमी होतो. तसेच डोळ्याच्या पडद्याचे आरोग्य उत्तम राहते.

५) आंबट फळे : लिंबूवर्गीय फळांमध्ये क जीवनसत्त्वांचे प्रमाण जास्त असते. शरीरातील चयापचयामुळे निर्माण होणाऱ्या विषारी पदार्थ नष्ट करण्यासाठी क जीवनसत्वात असणारे अँटीऑक्सिडंट्स उपयोगी पडते. त्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना नुकसान होत नाही आणि डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.