भारतात सर्वाधिक टीआरपी मिळालेल्या या ५ बहुचर्चित प्रकरणांचे रहस्य अजूनही उलगडले नाही

१) प्रत्युषा बॅनर्जी :

“बालिका वधू” मालिकेतील आनंदीच्या रोलद्वारे प्रत्युषा बॅनर्जी यशाचा शिखरावर पोहोचली असतानाच १ एप्रिल २०१६ रोजी प्रत्युषाने गोरेगाव येथील आपल्या फ्लॅटमध्ये पंख्याला फास घेऊन आ त्महत्या केल्याची बातमी आली. प्रत्युषा तिच्या बॉयफ्रेंडसोबत गोरेगावच्या फ्लॅटमध्ये राहत होती. याप्रकरणी तिच्या आईवडिलांनी बॉयफ्रेन्डवर फसवणुकीचे आरोप केले. बॉयफ्रेंडला अटकही झाली, पण नंतर तो जामिनावर सुटला. मुंबई पोलीस आजही या प्रकरणाचा तपास करत आहेत.

२) जिया खान :

३ जून २०१३ रोजी बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या घरी पंख्याला लटकलेला तिचा मृ तदेह आढळून आला होता. सुरुवातीला हे आत्महत्येचे प्रकरण वाटले. पण नंतर जियाच्या आईने आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीने जियाचा खू न केल्याचा आरोप केला. सूरज पांचोलीला आयपीसीच्या कलम ३०६ नुसार अटक करण्यात आली आणि तीन आठवड्यानंतर जामिनावर सोडण्यात आले. जियाच्या मृत्यूने माध्यमांमध्ये बराच टीआरपी मिळवला, पण आजपर्यंत तिला न्याय मिळू शकला नाही.

३) दिव्या भारती :

१९९३ मध्ये मुंबईच्या वर्सोवा येथील तुलसी अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरुन पडून अभिनेत्री दिव्या भारतीचा मृत्यू झाला, त्यावेळी तिचे वय केवळ १९ वर्षे होते. दिव्या भारतीने आ त्महत्या केली होती की तिचा खू न झाला होता याबद्दल मुंबई पोलीस अद्याप काहीही तपस करू शकले नाहीत आणि १९९८ मध्ये त्यांनी या केसची फाईल बंद केली. सांगितले जाते की खिडकीतून तोल जाऊन पडून दिव्याचा मृत्यू झाला.

४) आरुषि तलवार :

जगातील सर्वात रहस्यमयी असा आरुषी-हेमराज यांचा खून १५ मे २००८ रोजी नोएडा येथील जलवायू विहाराच्या L-32 फ्लॅटमध्ये करण्यात आला होता. सीबीआयच्या रिपोर्टमध्ये आरुषीचे आईवडील राजेश आणि नूपुर यांचे नाव आरोपपत्रात आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. सीबीआयने तलवार दाम्पत्यावर आरुषी-हेमराजची ह त्या केल्याचा आणि त्यानंतर घरातील पुरावे मिटवल्याचा आरोप केला होता.

आरुषीच्या आईवडिलांनी सीबीआयचे आरोप अमान्य केले. परंतु सीबीआय कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आजही तलवार दाम्पत्य स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कोर्टाच्या फेऱ्या मारत आहेत.

५) भंवरी देवी :

२०११ साली से क्स, सीडी आणि रक्तरंजित राजकारणात बंदिस्त झालेले राजस्थानमधील भंवरी देवी खू न प्रकरण खूप गाजले होते. दिसायला अत्यंत सुंदर आणि मादक असणारी भंवरी देवी नोकरीच्या मागणीसाठी स्थानिक आमदार मलखान सिंह यांच्याकडे गेली. तेव्हा मलखान सिंहांनी तिला जलसंपदा मंत्री महिपाल मदेरणा यांच्याकडे नेले. दोघांनी कलेक्टरकडे शिफारस करुन जालीवाडा सरकारी दवाखान्यात नोकरी दिली.

त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढली होती. त्यांनतर तिचा खू न झाला. सीबीआयच्या माहितीनुसार भंवरी देवीकडे मंत्री मदेरणा यांच्यासोबत नको त्या अवस्थेतील चित्रण केलेली सीडी होती. त्यावरुन ती मंत्र्यांना ब्लॅकमेल करत होती. याचा खुलासा झाल्यानंतर मदेरणा यांना राजीनामा द्यावा लागला, शिवाय मलखान सिंह आणि मदेरणा यांना तुरुंगातही जावे लागले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.