राईट बंधूंनी विमानाचा शोध लावल्यापासून त्यात अनेक बदल होत गेले आणि आजची प्रवासी विमाने आली. संपूर्ण जग हवाईमार्गाने जोडलं गेलं. जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंतचा प्रवास सोपा झाला. जागतिकीकरणानंतर नोकरी, शिक्षण किंवा उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने हे विश्वाची माझे घर म्हणत लोकांनी जग हेच एक वैश्विक खेडे बनवले.
परंतू जगामध्ये आजही असे देश आहेत जिथे अद्याप विमानसेवाच पोहोचली नाही. यामागचे कारण म्हणजे त्या देशांना अद्याप स्वतःची विमानतळेच नाहीत. पाहूया त्या ५ देशांबद्दल…
१) मोनॅको :
मोनॅको हा एक युरोपातील आणि आकाराने सर्वात छोटा असणारा जगातील दुसरा देश आहे. त्याचे क्षेत्रफळ केवळ २ चौकिमी आहे. या देशात आयकर भरावा लागत नसल्याने मोठमोठे उद्योगपती आणि श्रीमंत लोक इथे राहायला आहेत. मोनॅकोच्या एका बाजूला भूमध्य समुद्र तर तीन बाजूंना फ्रांस देश आहे. या देशाला स्वतःचे विमानतळ नसल्याने ते फ्रान्सचा विमानतळ वापरतात. मोनॅकोला येणारे प्रवासी फ्रान्समधील विमानतळावर उतरून नंतर रस्तेमार्गाने मोनॅकोला येतात.
२) अंदोरा :
अंदोरा हा युरोपच्या दक्षिण पश्चिमी भागात वसलेला अतिशय लहान देश आहे. पूर्वेकडील पायरेनिस पर्वत प्रदेशात तो वसला आहे. त्याचे क्षेत्रफळ ४६७ चौकीमी आहे. त्याच्या उत्तर-पूर्व सीमेला फ्रांस तर दक्षिण-पश्चिम सीमेला स्पेन देश आहे. पर्वतीय प्रदेशात असल्याने या देशाला स्वतःचे विमानतळ नाही. मात्र इथे तीन खाजगी हेलिपॅड्स आहेत. पर्यटनासाठी अंदोराला येणारे लोक १२ किमी अंतरावरील शेजारच्या देशातील विमानतळावर उतरतात.
३) लिश्टनस्टाइन :
लिश्टनस्टाइन या देशाचं नाव आपल्यापैकी कित्येकांनी तर ऐकले सुद्धा नसेल. पण आश्चर्याची बाब म्हणजे मानवी अस्तित्वाच्या आणि शेतीच्या सर्वात प्राचीन खुणा या देशात सापडल्या आहेत. १६० चौकीमी क्षेत्रफळ असणारा हा देश युरोपच्या पश्चिम भागात असणाऱ्या स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया या दोन देशांनी वेढलेला आहे. या देशाचा मोठा भाग आल्प्स पर्वतराजीत येत असल्याने इथे विमानतळ नाही. इथेही काही हेलिपोर्ट्स आहेत.
४) सान मारिनो :
सान मारिनो हा युरोपातील एक देश पूर्णपणे इटली देशाच्या पोटातच वसला आहे. केवळ ६१ चौकीमी क्षेत्रफळ असणाऱ्या या देशाचे नाव सेंट मॅरीनस यांच्या नावावरुन पडले आहे. या देशाचा बराचसा भाग डोंगराळ असल्याने इथे एकही विमानतळ नाही. या देशाला इटलीच्या विमानतळाचा वापर करावा लागतो. तरीही या देशाला २२ % उत्पन्न पर्यटनाच्या माध्यमातून मिळते. इथे १५ % लोक फॉरेनर आहेत. काही श्रीमंतांकडे खाजगी हेलिपॅड्स आहेत.
५) व्हॅटिकन सिटी :
जगातील सर्वात लहान देश अशी व्हॅटिकन सिटीची ओळख आहे. हा देश इटलीच्या रोम शहरात वसला आहे. याचे क्षेत्रफळ केवळ ०.४४ चौकिमी इतके कमी आहे. लोकसंख्या १००० आसपास असून इथे ख्रिश्चन धर्मगुरू पोप वास्तव्याला असल्याने ते ख्रिश्चन धर्मियांचे सर्वात पवित्र स्थळ आहे.
इतके कमी क्षेत्रफळ असल्याने या देशाकडे स्वतःचा विमानतळ नाही. इटलीचा विमानतळ ते वापरतात. एवढे असले तरी जगात सर्वाधिक वाईन व्हॅटिकन सिटीमध्ये पिण्यात येत असल्याचा विक्रम त्यांच्या भावावर आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.